Neeraj Chopra: नीरज मायदेशी उशीरा का येणार? मोठं कारण आलं समोर

Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा भारतात जवळपास एक-दीड महिन्यांनी परतण्याची शक्यता आहे.
Neeraj Chopra | Paris Olympics 2024
Neeraj Chopra | Paris Olympics 2024Sakal
Updated on

Neeraj Chopra Fitness: भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणाऱ्या नीरज चोप्राने नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत रौप्य पदक जिंकले. हे त्याचे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होत. त्यामुळे तो ऍथलेटिक्समध्ये भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा नॉर्मन प्रिचर्ड यांच्यानंतरचा दुसराच खेळाडू ठरला.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता सर्व खेळाडू आपापल्या मायदेशी परतले आहेत. भारतीय खेळाडूही मायदेशी येत आहेत. मात्र नीरज जर्मनीला गेला आहे. यामागील कारण म्हणजे तो वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जर्मनीला गेला आहे.

Neeraj Chopra | Paris Olympics 2024
Neeraj Chopra: नीरजच्या आईने अर्शदला लेक म्हटलंय, आता पाकिस्तानी खेळाडूची आई काय म्हणाली, पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.