Indian men's hockey squad: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा भारतीय पुरुष हॉकी संघ पुन्हा मैदानावर उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. भारतीय संघ या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. ८ ते १७ सप्टेंबर या कालावधीत चीनमधील इनर मंगोलियातील हुलुनबुईर येथे ही स्पर्धा होणार आहे. आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १८ सदस्यीय पुरुष संघाची घोषणा केली आहे.
पॅरिसमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेन विरुद्ध २-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली हॉकी संघाने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आणि गोलरक्षक पी.आर.श्रीजेश यांना निवृत्तीचे गिफ्ट दिले होते. गोलरक्षक श्रीजेश याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघातील ही पोकळी भरून काढण्याचे आव्हान युवा खेळाडूंवर आहे. कृष्णा पाठक याला संधी दिली गेली आहे. मुंबईचा सुरज करकेराला राखीव गोलरक्षक म्हणून संघात निवडले गेले आहे.
ऑलिम्पिकपदक विजेत्या संघातील दहा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग या पाच खेळाडूंना या विश्रांती देण्यात आली आहे. भारत, दक्षिण कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान चीन या स्पर्धेत सर्वोच्च पदकासाठी लढतील.
गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा
बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित
मिडफिल्डर - राज कुमार पाल, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद सिंह. राहिल मौसीन
फॉरवर्ड- अभिषेक, सुखजीत सिंग, अराईजीत सिंग हुंदल, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग
8 सप्टेंबर - भारत विरुद्ध चीन
9 सप्टेंबर - भारत विरुद्ध जपान
11 सप्टेंबर - भारत विरुद्ध मलेशिया
12 सप्टेंबर - भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
14 सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान
16 सप्टेंबर - उपांत्यफेरी सामना
17 सप्टेंबर - अंतिम सामना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.