Olympic History of India : ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक केव्हा जिंकले? प्रथम केव्हा झाले होते सहभागी?

Indian Olympic History : ११३ खेळाडूंचा चमू घेऊन भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
Indian olympic history first medal first participation
Indian olympic history first medal first participationSakal
Updated on

India at Olympic : १८९६ साली पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ग्रीसच्या अथेन्स येथे झाली होती. पण, भारताने क्रीडा विश्वाच्या महोत्सवात १९०० मध्ये सहभाग घेतला आणि भारतासाठी २०२० मध्ये ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली गेली, ज्यामध्ये भारताने सर्वाधिक सात पदके जिंकली होती.

ऑलिम्पिकमध्ये पहिला सहभाग...

१९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताने सुरुवात केली. पण, भारतीय संघाकडून खेळणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी दोन पदकं जिंकली होती. पिचर्ड यांचा जन्म २३ जून १८७५ रोजी कलकत्ता येथे ब्रिटिश भारताच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये झाला. नॉर्मन प्रिचार्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक १९०० मध्ये २०० मीटर अडथळा शर्यतीत भाग घेतला. पण, भारताने १९२० मध्ये अँटवर्प ऑलिम्पिकसाठी आपला पहिला अधिकृत संघ पाठवला. पी सी बॅनर्जी ( स्प्रिंट), पी डी चौघुले ( १०,००० मी. व मॅरेथॉन), सदाशिव दातार ( १०,००० मी. व मॅरेथॉन), एच डी कैकाडी ( ५००० मी. व १०,००० मी.), दिनकरराव शिंदे ( कुस्ती), के नवले ( कुस्ती) यांनी सहभाग घेतला होता.

Indian olympic history first medal first participation
Olympics 2024 Schedule: भारताचा ११३ जणांचा चमू Paris गाजवणार; वेळापत्रक जे माहित असायलाच हवं

भारताचे पहिले पदक...

१९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले होते. त्यावेळी नॉर्मन प्रिचर्ड यांनी २०० मीटर अडथळ्याची शर्यत आणि २०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. पण अधिकृतपणे, भारताला पहिले पदक १९२८ मध्ये ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने जिंकून दिले. भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते. या संघाचे नेतृत्व ध्यानचंद करत होते आणि यानंतर १९३२ व १९३६ मध्ये हॉकीमध्ये सुवर्णपदकाची परंपरा कायम राखली.

१९५२ मध्ये महाराष्ट्राचे सुपूत्र खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले. त्यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पाहण्यासाठी भारताला २०२०चा ऑलिम्पिकची वाट पाहावी लागली. भालाफेकपटू नीरज चोप्राने हा पराक्रम केला. कुस्तीपटू सुशील कुमार व बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांच्या नावावर दोन ऑलिम्पिक पदकं आहेत.

भारताची एकूण पदक संख्या..

पॅरिस ऑलिम्पिक १९०० पासून टोकियो ऑलिम्पिक २०२० पर्यंत, भारताने आतापर्यंत २५ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. एकूण १२१८ भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० पर्यंत भारताने सर्वाधिक ७ पदकं जिंकली आहेत. भारताने एकूण ३५ पदकं जिंकली आहेत आणि ज्यामध्ये १०सुवर्ण, ०९ रौप्य आणि १६ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारतीय हॉकी संघाने भारतासाठी सर्वाधिक १२ पदके जिंकली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.