Big Breaking: CAS ने याचिका फेटाळली; भारतीय खेळाडूवर १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई

Paralympic Champion Action of 18 months suspension: ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केलेली असताना भारताला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे..
Pramod Bhagat Suspended
Pramod Bhagat Suspended esakal
Updated on

Paris 2024 Paralympic Games: ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला १ रौप्य व ५ कांस्य अशा सहा पदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याकडून हक्काचे पदक हिसकावण्यात आल्याने भारतीय चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विनेशचं प्रकरण क्रीडा लवादाकडे प्रलंबित असताना मंगळवारी रात्री त्यावर निकाल येणार आहे. पण, मंगळवारची सकाळ भारतीय चाहत्यांना धक्का देणारी ठरली.

भारताला टोकियो २०२० पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या प्रमोद भगत ( Pramod Bhagat) याच्यावर १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली गेली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने ( BWF) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १८ महिन्यांच्या निलंबनामुळे प्रमोदला आगामी पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेता येणार नाही.

Pramod Bhagat Suspended
Vinesh Phogat verdict: चेहऱ्यावर निराशा, थकलेलं शरीर; 'त्या' घटनेनंतर विनेशचा पहिला Video समोर

BWF च्या अँटी-डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. १ मार्च २०२४ रोजी, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट (CAS) डोपिंग विरोधी विभागाने केलेल्या पाहणीत भगत १२ महिन्यांत तीन डोप टेस्टमध्ये अयशस्वी ठरला होता. भगत SL3 या गटातून खेळतो आणि त्याने या निर्णयाविरोधात CAS Appeals Division कडे दाद मागितली. २९ जुलै २०२४ मध्ये CAS अपील विभागाने ही याचिका फेटाळून लावली आणि CAS अँटी-डोपिंग विभागाचा निर्णय कायम राखला. त्याचा अपात्रतेचा कालावधी आता लागू झाला आहे.

कोण आहे प्रमोद भगत?

प्रमोद भगत हा बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील एक व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. तो सध्या पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये जागतिक क्रमवारीत 2 व्या क्रमांकावर आहे आणि २०२० पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL3 मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

पाच वर्षांचा असताना त्याला पोलिओ झाला आणि ज्यामुळे त्याच्या डाव्या पायावर परिणाम होऊन अपंगत्व आले. वयाच्या १३ व्या वर्षी तो बॅडमिंटनचा सामना पाहण्यासाठी गेला होता आणि त्याला खेळाची भुरळ पडली. पुढची दोन वर्षे फूटवर्क, तंदुरुस्तीवर त्याने काम केले. प्रमोद १५ वर्षांचा असताना सामान्य श्रेणीतील खेळाडूंविरुद्ध त्याची पहिली स्पर्धा खेळला. त्याला प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्याला त्याच्या बॅडमिंटन कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.