Paris Olympic 2024: पिक्चर अभी बाकी है ! मनू भाकर करणार 124 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती? भारतासाठी इतिहास घडवण्याची मोठी संधी...

Manu Bhaker in Paris Olympic 2024: मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं आहे. आता तिला आणखी एक पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.
Manu Bhaker | Paris Olympic 2024
Manu Bhaker | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Manu Bhaker in Paris Olympic 2024: भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने रविवारी मोठा पराक्रम केला. तिने सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.

मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची एकूण ५ वी खेळाडू, तर पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. असं असतानाच आता तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.

सोमवारी मनू भाकरने भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्रता मिळवली आहे. सोमवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकाराची क्वालिफायर झाली. या प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीनं तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे आता ते कांस्य पदकासाठी खेळतील.

Manu Bhaker | Paris Olympic 2024
Manu Bhaker : भगवत गीतेचे स्मरण अन् मनु भाकरने साधला शेवटचा निशाना...! कास्य जिंकल्यानंतर प्रतिक्रियेचा व्हिडिओ मन जिंकणारा

सोमवारी झालेल्या क्वालिफायर्समध्ये तुर्की आणि सार्बिया देशाच्या जोड्यांनी पहिले दोन स्थान पटकावले, त्यामुळे ते सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरले. तसेच कोरियाची ये जीन ओह - वोन्हो ली ही जोडी चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे आता मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा सामना कांस्य पदकाच्या सामन्यात ये जीन ओह - वोन्हो ली यांच्याविरुद्ध होईल.

दरम्यान, जर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्य पदक जिंकले, तर मनूच्या नावाची इतिहासात नोंद होईल. जर तिला हे यश मिळाले, तर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी दोन पदके जिंकणारी पहिलीच महिला खेळाडू ठरेल.

यापूर्वी असा विक्रम तब्बल १२४ वर्षांपूर्वी नॉर्मन प्रिचर्ड यांनी केला होता. त्यांनी १९०० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यत आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यत या दोन प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.

Manu Bhaker | Paris Olympic 2024
Paris Olympic: मनू भाकरची नजर पुन्हा ब्राँझ मेडलवर, सरबज्योतसह तिसऱ्या जागेसाठी साधणार निशाणा! अर्जून-रिदम क्वालिफायर्समधून बाद

तथापि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की प्रिचर्ड यांनी भारताचं प्रतिनिधित्व करताना ही दोन पदकं मिळाली असली, तरी स्वातंत्र्यापूर्वी ही पदकं मिळाली आहेत. त्यामुळे ते भारतीय नागरिक होते की नाही, यावरून आजही वाद पाहायला मिळतात.

दरम्यान, आत्तापर्यंत सुशील कुमार आणि पीव्ही सिंधू यांनी वैयक्तिकरित्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. परंतु, त्यांनी दोन पदके वेगवेगळ्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत. सुशील कुमारने २००८ आणि २०१२ साली कुस्तीमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदक जिंकले होते. तसेच पीव्ही सिंधूने २०१६ साली रौप्य, तर २०२१ मध्ये कांस्य पदक जिंकले होते.

तसेच आत्तापर्यंत भारताच्या हॉकी संघाने सर्वाधिक १२ पदके जिंकली आहेत. यातील ८ सुवर्णपदके आहेत, तर तीन कांस्य पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर एक रौप्य पदक जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.