Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघ जाहीर; अचूक लक्ष्य साधण्यासाठी नेमबाज सज्ज

सुमा शिरुर व रोनक पंडित या महाराष्ट्रीयन खेळाडूंचे भारतीय नेमबाजी संघाला मार्गदर्शन लाभणार आहे.
Paris Olympics 2024
Paris Olympics 2024 Sakal
Updated on

नवी दिल्ली ­­: पॅरिस ऑलिंपिक या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक क्रीडा महोत्सवासाठी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडून भारतीय संघाची निवड करण्यात आली. मनू भाकर ही एकमेव खेळाडू दोन वैयक्तिक प्रकारात सहभागी होणार आहे. स्वप्नील कुसळेच्या रूपात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू या संघाचा सदस्य आहे.

सुमा शिरुर व रोनक पंडित या महाराष्ट्रीयन खेळाडूंचे भारतीय नेमबाजी संघाला मार्गदर्शन लाभणार आहे. या संघात रायफल प्रकारात आठ खेळाडूंची, तर पिस्तुल प्रकारात सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याने १० मीटर रायफल प्रकारात भारताला कोटा मिळवून दिला होता; मात्र या जगज्जेत्या नेमबाजाला भारतीय संघात संधी देण्यात आली नाही. भारतीय नेमबाजी संघाची निवड ही चाचणीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर केली गेली आहे. त्यामुळे रुद्रांक्षला या संघात संधी मिळाली नाही.

दरम्यान, इटलीमध्ये शॉटगन प्रकाराचा नेमबाजी विश्‍वकरंडक बुधवारपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकारासाठी भारतीय संघाची निवड या स्पर्धेनंतर करण्यात येणार आहे. भारताने पॅरिस ऑलिंपिकसाठी २४ पैकी २१ जणांचा कोटा मिळवला आहे. भारतीयांची ही आतापर्यंतच्या ऑलिंपिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली, हे विशेष.

भारतीय नेमबाजी संघ (रायफल) ­­: १० मीटर एअर रायफल (पुरुष) - संदीप सिंग, अर्जुन बाबुता. १० मीटर एअर रायफल (महिला) - एलावेनिल वालारिवन, रमिता. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन (पुरुष) - ऐश्‍वर्य तोमर, स्वप्नील कुसळे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन (महिला) - सिफ्त कौर सामरा, अंजुम मौदगिल.

पिस्तुल ­­: १० मीटर एअर पिस्तुल (पुरुष) - सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा. १० मीटर एअर पिस्तुल (महिला) - मनू भाकर, रिदम सांगवान. २५ मीटर (पुरुष) - अनिश भानवाल, विजयवीर सिद्धू. २५ मीटर (महिला) - मनू भाकर, इशा सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.