Paris Olympic 2024: भारताच्या लक्ष्य सेनला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का; आता कांस्य पदकासाठी खेळणार

Lakshya Sen Badminton: भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला.
Lakshya Sen | Paris Olympic 2024
Lakshya Sen | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Lakshya Sen at Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रविवारी अनेक महत्त्वाचे सामने होत असून यातील एक सामना म्हणजे बॅडमिंटनमधील पुरुष एकेरी गटातील उपांत्य सामना.

या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेन विरुद्ध खेळण्यासाठी उतरला. पण या सामन्यात लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या या लढतीत लक्ष्य सेनला विक्टरने २०-२२, १४-२१ अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.

दरम्यान आता लक्ष्य सेनला कांस्य पदकासाठी खेळण्याची संधी आहे. त्याचा कांस्य पदकाचा सामना मलेशियाच्या झी जिया ली याच्यावरुद्ध होणार आहे. ली थायलंडच्या कुनलावुत विटीडसर्नविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभूत झाला आहे.

तसेच सुवर्ण पदकाचा सामना विक्टर एक्सेलसेन आणि कुनलावुत विटीडसर्न यांच्यात होईल. कांस्य पदकाचा आणि सुवर्ण पदकाचा सामना सोमवारी (५ ऑगस्ट) होणार आहे.

Lakshya Sen | Paris Olympic 2024
India at Paris Olympic 2024 Hockey: भारताकडून ग्रेट ब्रिटनचे 'Shoot Out'! उपांत्य फेरीत थाटात पोहचलो

लक्ष्य सेनची झुंज अपयशी...

अनुभवी विक्टर एक्सेलसेन याने सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्याच गेममध्ये त्याने ४-१ अशा फरकाने आघाडी घेतली होती. पण त्यानंतर लक्ष्ये सेनने चांगले पुनरागमन करत ६-६ अशी बरोबरी साधली. पण त्यानंतरही विक्टरचे काही चांगले स्मॅश केले, पण त्याला लक्ष्यकडूनही चांगले प्रत्युत्तर मिळाले.

लक्ष्यच्या ताकदवान स्मॅशचं उत्तर विक्टरलाही सुरुवातीला सापडलं नाही. दरम्यान, लक्ष्य सेनने १८-१३ अशी आघाडीही घेतली. त्यामुळे हा गेम तो जिंकेल असं वाटत होतं. मात्र विक्टरने त्याचा अनुभवाचा वापर करत दमदार पुनरागमन केले आणि ३ पाँइंट्स मिळवत लक्ष्यची आघाडी कमी केली. पण तरी लक्ष्यने २०-१७ अशी आघाडी घेतली. त्याच्याकडे तीन गेम पाँइंट होते.

पण विक्टरनेही हार मानली नाही. लक्ष्यलाही ३ गेम पाँइंट वाचवता आले नाहीत. त्यामुळे २०-२० अशी बरोबरी झाली. सामना रोमांचक वळणावर असताना विक्टरने २ पाँइट्स मिळवत गेम जिंकला.

Lakshya Sen | Paris Olympic 2024
Paris Olympic 2024 : लढत सोडणाऱ्या कारिनीला मिळणार बक्षीस; वादग्रस्त लढतीत निषेधाचा झेंडा रोवणाऱ्या बॉक्सरप्रती सहानुभूती

दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने सुरुवात अप्रतिम केली होती. त्याने ७-० अशी आघाडी मिळवली होती. पण पुन्हा एकदा विक्टरने पुनरागमन करत सलग ३ पाँइंट्स मिळवले. तरी दुसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत लक्ष्य आघाडीवर होता.

मात्र, नंतर विक्टरने लक्ष्य सेनला फारशी संधी न देता हा गेम सहज जिंकला आणि सामनाही जिंकला. त्यामुळे आता विक्टरला सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी असणार आहे. विक्टर टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे.

दरम्यान, लक्ष्य सेन पराभूत झाला असला तरी त्याने मोठा विक्रम केला आहे. तो पुरुषांच्या एकेरी गटात उपांत्य सामना खेळणारा पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू आहे. आता जर त्याने कांस्य पदकाच्या सामन्यात विजय मिळवला, तर तो सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारा तिसराच भारतीय ठरेल, तर पहिलाच भारतीय पुरुष खेळा़डू ठरेल.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.