मोठा धक्का : भारताची कुस्तीपटू Antim Panghal वर तीन वर्षांची बंदी? IOA म्हणते...

Antim Panghal Banned - भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat) हिच्या अपात्रतेच्या कारवाईमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चर्चेत असताना आणखी एक मोठी बातमी हाती लागली आहे.
मोठा धक्का : भारताची कुस्तीपटू Antim Panghal वर तीन वर्षांची बंदी? IOA म्हणते...
Updated on

Paris Olympic 2024 Antim Panghal to be banned for three years पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंतिम पंघाल ( Antim Panghal) हिला पोलिसानी समन्स बजावले आहे. त्याला कारणीभूत तिची बहीण ठरली आहे. अंतिमला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तुर्कीच्या झेयनेप येतगीलने ७९ सेकंदात मॅच १०-० अशी जिंकली. पण, आता अंतिमवर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे, PTI ने तसे वृत्त दिले आहे. पण, भारतीय ऑलिम्पिक समिती ( IOA ) ने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

काल नेमकं काय घडलं?

अंतिम पंघालच्या बहिणीने अंतिमच्या प्रवेश कार्डावर ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तिला पॅरिस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिला सोडले जाईल परंतु उद्या अंतिम आणि संपूर्ण दलासह तिला हद्दपार केले जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण समोर येताच भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्यांची एकच पळापळ सुरू झाली आहे. त्यांच्याकडून हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अतिंम आणि तिच्या सपोर्ट स्टाफला मायदेशात पाठवण्याचा निर्णय IOA ने घेतला आहे.

पण आताच हाती आलेल्या वृत्तानुसार कुस्तीपटू अंतिम पंघालवर ऑलिम्पिकदरम्यान अनुशासन भंग केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून ( IOA) तीन वर्षांची बंदी घातली गेली आहे. पण, हे वृत्त चुकीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अंतिमने २०२३ च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. भारताला २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत पदक मिळवून देणारी अंतिम ही पहिलीच खेळाडू आहे. आशियाई स्पर्धा व आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २०२३ मध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते.

अंतिम काय म्हणतेय...?

अंतिमने तिला अटक केल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ती म्हणाली, काल माझा पराभव झाला. मला पोलिसांनी पकडलं हे वृत्त चुकीचं आहे. पराभवानंतर मला ताप आला होता आणि मी माझ्या बहिणीकडे जी हॉटेलमध्ये राहत होती जाण्याची परवानगी मागितली. मला परवानगी दिली गेली आणि मी हॉटेलमध्ये गेली. मला ऑलिम्पिक व्हिलेजमधून काही वस्तू हव्या होत्या आणि मी माझ्या बहिणीला त्या आणायला सांगितल्या. त्यानंतर माझ्या कार्डवर ती व्हिलेजमध्ये गेल आणि त्यानंतर तिला पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. माझ्या कोचने कॅब ड्रायव्हरसोबत भांडणं केल्याचे वृत्तही चुकीचे आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.