Vinesh Phogat: 'माझ्या परवानगीशिवाय फोटो काढला अन्...', विनेशचा IOA अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर आरोप

Vinesh Phogat accused IOA president PT Usha: विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान परवानगीशिवाय हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत फोटो काढल्याचा आरोप पीटी उषा यांच्यावर केला आहे.
Vinesh Phogat
Vinesh Phogat Sakal
Updated on

Vinesh Phogat News: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आधी पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरी आणि तिथे घडलेल्या घटनांमुळे, तर आता तिने राजकारणाच्या आखाड्यात पाऊल टाकल्यामुळे. आता तिने एक खळबळजनक वक्तव्य करताना भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (IOA) अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान तिच्या परवानगीशिवाय हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत फोटो काढल्याचा आरोप तिने पीटी उषा यांच्यावर केला आहे. तिने म्हटले आहे की त्या प्रकरणाचे राजकारण करण्यात आले.

विनेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात खेळली होती. तिने अंतिम सामन्यापर्यंतही धडक मारली होती. ती ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती.

मात्र, अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन नियमानुसार अधिक भरलं, यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. याच कारणानं तिचं पदकही हुकलं.

Vinesh Phogat
Vinesh Phogat Salary: काँग्रेसचा 'हात' धरण्यासाठी विनेशने किती रुपयांच्या पगारावर मारली 'लाथ'? डोकं चक्रावेल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.