No silver medal for Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिची याचिका क्रीडा लवादाने बुधवारी फेटाळली. अपात्रतेच्या निर्णयावर तिने दाखल केलेल्या याचिकेवर १६ ऑगस्टला निकाल दिला जाणार होता, परंतु CAS ने तिची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे विनेशला आता रौप्यपदक मिळणार नाही हे निश्चित झाले आणि हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेदरम्यान भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले. अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने ऑलिम्पिक समितीने तिच्यावर ही कारवाई केली. त्यामुळे तिला सुवर्णपदकाचा सामनाही खेळता आला नव्हता. यामुळेच तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती आणि किमान संयुक्त रौप्यपदक दिले जावे अशी विनंती केली होती. तिची ही याचिका फेटाळण्यात आली आहे.