Paris Olympic 2024 : धूम्रपान केल्यामुळे १९ वर्षीय स्टार खेळाडूची संघातून हकालपट्टी!

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जपानच्या कलात्मक जिम्नॅस्टिक संघाला मोठा धक्का बसला आहे.
Japan women gymnastics captain out of paris olympic 2024 Games
Japan women gymnastics captain out of paris olympic 2024 Gamessakal
Updated on

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जपानच्या कलात्मक जिम्नॅस्टिक संघाला मोठा धक्का बसला आहे. १९ वर्षीय कर्णधार शाको मियाताने धूम्रपान केल्यामुळे तिची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जपानच्या जिम्नॅस्टिक संघटनेने ही माहिती जाहीर केली.

Japan women gymnastics captain out of paris olympic 2024 Games
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताच्या मानधना, दिप्ती, अन् हरमनप्रीतसाठी ठरला विक्रमी; जाणून काय केलेत पराक्रम

जपानच्या कलात्मक जिम्नॅस्टिक संघाचे सराव शिबिर मोनाको येथे सुरू आहे. तेथे शाको मियाता धूम्रपान करत होती. तिच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. परिणामी तिला सराव शिबिर सोडून मायदेशी परतावे लागले. जपानमध्ये आता या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे.

Japan women gymnastics captain out of paris olympic 2024 Games
Women's Asia Cup 2024: भारताची विजयी सुरुवात! पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

१९६४ मध्ये टोकियोत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत जपानने कलात्मक जिम्नॅस्टिकचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता पॅरिसमधील स्पर्धेत पुन्हा तीच कामगिरी करण्यासाठी जपानचा संघ चांगली तयारी करत आहे; पण स्पर्धेत सहभागी होण्याअगोदरच त्यांच्यासाठी हा धक्का आहे.

Japan women gymnastics captain out of paris olympic 2024 Games
Suryakumar Yadav: 'मला मिळालेली नवी भूमिका...', भारताचा T20I कर्णधार झाल्यानंतर सूर्याची स्पेशल पोस्ट

मियाती ही उत्तम जिम्नॅस्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. जपानमधील चाचणी स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी केल्यामुळे तिची संघात निवड झाली. एवढेच नव्हे, तर तिच्याकडे संघाचे नेतृत्वही देण्यात आले होते.

कलात्मक जिम्नॅस्टिक हा प्रकार चांगलाच लोकप्रिय असतो. या ऑलिंपिक स्पर्धेत जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा शर्यती २७ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.