Jyothi Yarraji first woman to participate in 100m hurdles at paris Olympics 2024
Jyothi Yarraji first woman to participate in 100m hurdles at paris Olympics 2024Sakal

Paris Olympic 2024 : मजुरी करून आईने वाढवलं; ऑलिम्पिक गाजवून तिला भेट द्यायचीय! ज्योतीची भावनिक गोष्ट

ज्योती यराजी पॅरिस ऑलिंपिकमध्ये हर्डल्स शर्यतीत प्रत्येक हर्डल्स पार करीत असताना ती एकप्रकारे तिच्या आईने तिला घडविण्यासाठी केलेला संघर्ष मागे टाकत जाईल.
Published on

नवी दिल्ली : ज्योती यराजी पॅरिस ऑलिंपिकमध्ये हर्डल्स शर्यतीत प्रत्येक हर्डल्स पार करीत असताना ती एकप्रकारे तिच्या आईने तिला घडविण्यासाठी केलेला संघर्ष मागे टाकत जाईल. ज्योतीला घडविण्यासाठी तिची आई विशाखापट्टणमच्या रुग्णालयात मोलकरीण व साफसफाई कर्मचारी म्हणून दोन पाळ्यात काम करते.

पॅरिसमध्ये १०० मीटर हर्डल्सच्या प्राथमिक फेरीत ज्यावेळी ज्योती स्टार्टिंग ब्लॉकवर पाय ठेवेल, त्यावेळी तिच्या आईचा सकारात्मक दृष्टिकोन तिच्यासोबत असेल. जागतिक रँकिंगच्या माध्यमातून पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली ज्योती ऑलिंपिक १०० मीटर हर्डल्स शर्यतीत भाग घेणारी पहिली भारतीय होय. 'आधी मी माझ्या घरची परिस्थिती, वैयक्तिक जीवन आणि परिवारामुळे खूप विचार व चिंता करायची', असे ज्योती म्हणाली.

'माझी परिस्थिती कधी-कधी खूप वाईट असते. कारण माझी आई म्हणते, आपण वर्तमान, भूतकाळ व भविष्यकाळ थांबवू शकत नाही, त्यामुळे पुढे चालत राहा. तू फक्त तुझ्यासाठी मेहनत करीत राहा, जो निकाल येईल, तो स्वीकार करायचा.

माझी आई मला कधीही स्पर्धेच्या आधी सुवर्णपदक किंवा पदक जिंक असे म्हणत नाही. तिचे म्हणणे एवढेच असते की, तंदुरुस्त राहा, जे काही करशील, त्याबद्दल आनंदी व समाधानी राहा. त्यामुळेच मी सकारात्मक मानसिकतेने पुढे जात असते', असे ज्योतीने सांगितले. 'सकारात्मक मानसिकतेने आपण भूत आणि भविष्यकाळाचा फारसा विचार न करता आपण आपले वर्तमान उंचावू शकतो, असेही ती मला म्हणते', असेही ज्योतीने सांगितले.

पूर्वी माझ्यासोबत फार काही चांगली टीम नव्हती. आता बरेच लोक आहेत, ज्यांच्यामुळे मला फायदा होतो. विशेषतः प्रशिक्षक जेम्स हिलर यांच्यामुळे मला खूप फायदा झाल्याचे तिने सांगितले. ज्योतीच्या नावावर १२.७८ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम असून ऑलिंपिकमध्ये पदार्पण करताना दबाव राहणार असल्याचे तिने मान्य केले.

ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा मला अनुभव नसला तरी आशियाई ॲथलेटिक्स, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक स्पर्धेचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. तो अनुभव मी पॅरिसमध्ये प्रत्यक्षात आणेल. पॅरिसमधील स्पर्धा प्रचंड आव्हानात्मक असली तरी मी माझ्या शर्यतीवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि सरावात जे केले ते शर्यतीत उतरविण्याचा माझा प्रयत्न राहील.

- ज्योती यराजी

१०० मीटर हर्डल्सचा स्पर्धा कार्यक्रम एकूण स्पर्धक ४२

  • ७ ऑगस्ट - दुपारी १.४५ - प्राथमिक फेरी

  • ८ ऑगस्ट - दुपारी २.०५ - रेपॅच फेरी

  • ९ ऑगस्ट - दुपारी ३.३५ - उपांत्य फेरी

  • १० ऑगस्ट - रात्री ११.१५ - अंतिम फेरी

(भारतीय वेळेनुसार)

  • विश्वविक्रम - तोबी अमुसान (नायजेरिया-१२.१२ सेकंद)

  • ऑलिंपिक विक्रम - जस्मिन क्वीन (प्युर्टो रिको - १२.२६ सेकंद)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.