Manika Batra : मनिकाने रचला इतिहास! गेल्या १६ ऑलिम्पिकमध्ये जे घडलं नाही ते घडलं, चीनी साम्राज्य मोडून काढणार?

Paris Olympics 2024 News : भारताची टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. 29 वर्षीय मनिकाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या टेबल टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Paris Olympics 2024 Table Tennis Manika Batra
Paris Olympics 2024 Table Tennis Manika Batrasakal
Updated on

Paris Olympics 2024 Table Tennis Manika Batra : भारताची टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. 29 वर्षीय मनिकाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या टेबल टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑलिम्पिक इतिहासात अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील टेबल टेनिस महिला एकेरीच्या 32 व्या फेरीत 12व्या मानांकित प्रितिका पावडेला पराभूत करून मनिकाने इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवले. य

Paris Olympics 2024 Table Tennis Manika Batra
IND vs SL 3rd T20 : तिसऱ्या मॅचपूर्वी श्रीलंकेत मुसळधार पावसाचा तांडव! कर्णधार सूर्याच्या पोस्टमुळे वाढले टेन्शन

मनिकाने महिला एकेरीच्या राउंड ऑफ 32 सामन्यात शानदार सुरुवात केली. मनिकाने फ्रान्स खेळाडूचा 11-9, 11-6, 11-9, 11-7 असा पराभव केला. तिने फ्रान्स खेळाडूवर 4-0 ने विजय मिळवला आणि 16 फेरी गाठली. मनिकाने यापूर्वी 64 च्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या ॲना हर्सीचा पराभव केला होता, ज्यामध्ये तिने फक्त एक सेट गमावला होता. 32 च्या फेरीत मनिकाचा पुढील सामना हाँगकाँगच्या झू सी आणि जपानच्या एम हिरानो यांच्याशी होईल.

1988 पासून टेबल टेनिस स्पर्धात ऑलिंपिकमध्ये चीनच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले आहे. त्यांनी 37 स्पर्धांमध्ये एकूण 60 पदके जिंकली. त्यामुळे मनिका बत्रा यावेळी चीनी साम्राज्य मोडून काढणार का? यांची उत्सुकता लागली आहे.

Paris Olympics 2024 Table Tennis Manika Batra
Paris Olympic 2024: मनू भाकरला दुसरं मेडल जिंकण्याची संधी; रोइंग, बॉक्सिंग अन् हॉकीचेही रंगणार सामने, पाहा चौथ्या दिवसाचं वेळापत्रक

दुसरीकडे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांना चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्ही खेळाडू पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पुरुष एकेरीत अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई 16 च्या फेरीत बाहेर पडले. त्याचबरोबर महिला एकेरीत श्रीजा अकुला चांगली कामगिरी करत आहे. श्रीजाचा पुढील सामना मंगळवारी (३० जुलै) 32 च्या फेरीत सिंगापूरच्या झेंग जियानशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.