India at Paris Olympic 2024 Live : Manu Bhaker चे तिसरे ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं, शूट ऑफमध्ये बाद

Manu Bhaker Paris Olympic 2024 : नेमबाज मनू भाकरने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील अपयशानंतर केलेले कमबॅक सर्वांना अचंबित करणारे ठरतेय. तीन २५ मीटर पिस्तुल प्रकारातही जबरदस्त कामगिरी केली, परंतु शूट ऑफमध्ये तिचे पदक थोडक्यात हुकले...
Manu Bhaker Medal Olympic
Manu Bhaker Medal Olympic esakal
Updated on

Shooting Manu Bhaker creat History Paris Olympic 2024 : नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अविस्मरणीय केले आहे. १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक अशी दोन कांस्यपदकं तिने नावावर करून इतिहास घडवला. इतिहासात भारतासाठी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. १९०० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारी मनु ही पहिलीच भारतीय ठरली होती. आज तिला एक पाऊल पुढे टाकण्याची संधी होती, परंतु शूट ऑफमध्ये तिचे ऐतिहासिक तिसरे पदक थोडक्यात हुकले.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनुला फायनलमध्ये पोहोचता आले नव्हते... त्यानंतर ती खचली होती, निराश झाली होती. प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यासोबत वादही झाला होता. दोघांनी एकमेकांशी बोलणंही टाळलं होतं... पण, आपल्याला ऑलिम्पिक पदक जिंकायचं असेल तर जसपाल राणा सरांसारखाच कोच हवाय हे तिला कळुन चुकलं आणि तिने सरांना कॉल केला... सरही सर्व विसरून तिला शिकवण्यासाठी पुन्हा आले आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोघांनी मिळून इतिहास रचला...

Manu Bhaker Medal Olympic
Medal Tally Olympic 2024 : एकटी मनु भाकर किती प्रयत्न करणार? पदक तालिकेत भारतीय संघ बघा कुठेय

मनु भाकरची कामगिरी...

मनुने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात एक सुवर्ण ( २०२३) व एक कांस्य ( २०२२ ) पदक जिंकले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या नावावर ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदकं तिने जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण, ज्युनियार जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड कप, जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धा, युवा ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा अशा विविध स्पर्धा मनुने गाजवल्या आहेत.

२५ मीटर पिस्तुल फायनल...

मनु भाकरने तीन सीरिजमध्ये १० गुण घेताना दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पण चौथ्या सीरिजनंतर मनुची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आणि ती व्हिएतनामच्या खेळाडूसह १३ गुणांसह बरोबरीत राहिली. पाचव्या सीरिजमध्ये मनुने पाच अचूक लक्ष्य भेदून जबरदस्त पुनरागमन केले आणि १८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. हंगेरियाची मेजोर व्हेरॉनिका १९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होती.

सहाव्या सीरिजमध्ये मनुने पाचपैकी चार शॉट्स अचूक साधले आणि २२ गुणांसह ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. पण, तिला अन्य नेमबाजांकडून टक्कर मिळत होती आणि एक चूक कोणालाही महागात पडणारी ठरली असती. फ्रान्सच्या कॅमिल व मेजॉर हे मनुला टक्कर देत होते आणि सातव्या सीरिजमध्ये मनुने पुन्हा एकदा पाचपैकी चार शॉट्स अचूक मारून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली होती. पण, फ्रान्सची कॅमिल २६ गुणांसह मनुसह बरोबरीत होती. कोरियाची यांग जिन २७ गुणांसह अव्वल स्थानी होती.

Manu Bhaker Medal Olympic
India at Paris Olympic 2024 Live : टोकियोची पुनरावृत्ती! टीम इंडियाच्या पदकाच्या मार्गात 'तोच' जुना प्रतिस्पर्धी

८व्या सीरिजमध्ये मनुचे दोन शॉट्स चुकले आणि ती २८ गुणांसह तिसऱ्या स्थानी गेली. यावेळी हंगेरीच्या मेजॉर व्हेरॉनिका ( २८) हिच्यासह शूट ऑफ झाला. त्यात मनु हरली आणि तिला चौथ्या स्थानावर समाधानी रहावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.