Paris Olympic गाजवणाऱ्या नेमबाजांना लाखोंची बक्षीसं जाहीर; मनू भाकर, स्वप्नील कुसाळे अन् सरबज्योतला किती पैसे मिळणार ?

Paris Olympic Shooting medalist Prize Money: मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांना NRAI तर्फे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Manu Bhaker, Sarabjot Singh & Swapnil kusale
Manu Bhaker, Sarabjot Singh & Swapnil kusaleesakal
Updated on

Manu Bhaker, Sarabjot Singh & Swapnil kusale: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने ६ पदके जिंकली. यातील सर्वाधिक तीन पदके नेमबाजांनी मिळवून दिली. खंरतर आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरीही ठरली.

त्यामुळे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI)तर्फे शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा गुणगौरव करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजीमध्ये भारतासाठी तीन कांस्यपदके मिळवून दिली आहेत. नेमबाजीमध्ये भारतासाठी आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना NRAI तर्फे रोख बक्षिसेही जाहीर झाली आहेत.

Manu Bhaker, Sarabjot Singh & Swapnil kusale
Paralympic 2024: महाराष्ट्राच्या Sukant Kadam ने भारताचे बॅडमिंटनमधील पहिले पदक निश्चित केले

भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून नेमबाजीमध्ये विक्रम रचणाऱ्या मनू भाकरला ४५ लाख रुपये, ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला तिसरे कांस्य पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसळेला ३० लाख रुपये, तर मनू भाकर सोबत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र गटात भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या सरबजोत सिंगला १५ लाख रुपये बक्षीस NRAI कडून जाहीर झाले आहे.

NRAI सत्कार समारंभाला पॅरिस ऑलिम्पिकमधील संपूर्ण नेमबाजी पथक उपस्थित होते. सोबतच पथकातील इतर सदस्यांना NRAI तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

उच्च कार्यप्रदर्शन संचालक डॉ. पिएर बुशॉम, परदेशी रायफल प्रशिक्षक थॉमस फारनिक, विदेशी पिस्तूल प्रशिक्षक मुंखब्यार दोर्जसुरेन, राष्ट्रीय १० मीटर पिस्तूल प्रशिक्षक मीसमरेश जंग आणि राष्ट्रीय ५० मीटर रायफल प्रशिक्षक मनोज कुमार यांच्यासह सहाय्यक कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.

Manu Bhaker, Sarabjot Singh & Swapnil kusale
Paralympic 2024: भारतीय बॅटमिंटनपटूचा 'Flying Return'; प्रतिस्पर्धी खेळाडूने मॅचनंतर उचलून घेतले

NRAIचे प्रमुख कालिकेश सिंग देव म्हणाले, “आमचे नेमबाज, प्रशिक्षक आणि संपूर्ण सहकारी कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. या खेळात ते अग्रेसर आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे."

"ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे ही साधी कामगिरी नाही. त्यांना मिळणाऱ्या सर्व प्रशंसा आणि पुरस्कारांना ते पात्र आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या कामगिरीमुळे संपूर्ण भारतातील नेमबाजांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल. खेळाडूंसोबतच मैदानाबाहेर मेहनत घेणाऱ्या संपूर्ण NRAI टीमचे देखील अभिनंदन !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.