Paris Olympic Manu Bhaker : मनूची नजर मेडलच्या हॅट्‌ट्रिकवर! ऐतिहासिक क्षण मिस करू नका; वेळ नोट करून घ्या

Paris Olympic Games 2024 Update : भारताची २२ वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर ऑलिंपिकमध्ये तीन पदके जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. महिलांची २५ मीटर पिस्तूल प्रकाराची पात्रता फेरी शुक्रवारी पार पडली.
Paris Olympic Manu Bhaker
Paris Olympic Manu Bhakersakal
Updated on

Manu Bhaker In Women's 25m Pistol Final Time : भारताची २२ वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर ऑलिंपिकमध्ये तीन पदके जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. महिलांची २५ मीटर पिस्तूल प्रकाराची पात्रता फेरी शुक्रवारी पार पडली. मनू हिने या फेरीमध्ये ५९० गुणांची कमाई करीत दुसरा क्रमांक पटकावला. इशा सिंग हिला मात्र ५८१ गुणांसह १८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनू हिने अंतिम फेरीत प्रवेश केला असून इशा हिचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले आहे.

Paris Olympic Manu Bhaker
Paris Olympic 2024 : जोकोव्हीच-अल्काराझ 'गोल्डन' मॅच! सर्बियन खेळाडू विम्बल्डनचा वचपा काढणार?

मनू भाकर हिने याआधी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक पटकावले. त्यानंतर सरबज्योत सिंगच्या साथीने १० मीटर एअर पिस्तोल मिश्र प्रकारात पुन्हा तिला ब्राँझपदकाची कमाई करता आली.

भारताच्या एकाही खेळाडूला एका ऑलिंपिकमध्ये तीन पदकांची कमाई करता आलेली नाही. आतापर्यंत पॅरिसमध्ये दोन पदके जिंकून नवा इतिहास रचणाऱ्या मनू हिने आता तिसऱ्या पदकाकडे वाटचाल केली आहे. २५ मीटर पिस्तूल प्रकाराची अंतिम फेरी आज (ता. ३) रंगणार आहे. जो दुपारी एक वाजता रंगणार आहे.

Paris Olympic Manu Bhaker
Who Is Imane Khelif : कोण आहे नेमकी इमाने खलिफ? जी Olympicमध्ये सापडली वादाच्या भोवऱ्यात

प्रिसिशनमध्ये २९४ गुणांची कमाई

मनू भाकर हिने २५ मीटर पिस्तूलच्या पहिल्या टप्प्यात अर्थातच प्रिसिशनमध्ये २९४ गुणांची कमाई केली. यामध्ये तीन सीरिजमध्ये एकूण ३० शॉट मारण्याची संधी मिळते. मनू हिने यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पहिल्या सीरिजमध्ये ९७ गुणांची, दुसऱ्या सीरिजमध्ये ९८ गुणांची आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ९९ गुणांची कमाई करण्यात तिला यश मिळाले. प्रिसिशनमध्ये नेमबाजाला निशाणा साधण्यासाठी वेळ मिळतो. टार्गेट स्थिर असते.

Paris Olympic Manu Bhaker
Paris Olympic 2024 : शा कारी रिचर्डसन अमेरिकेचा २८ वर्षांचा दुष्काळ संपविणार?

रॅपिडमध्येही अचूक निशाणा

२५ मीटर पिस्तूल प्रकाराचा दुसरा टप्पा रॅपिड होता. अर्थातच यामध्ये नेमबाजांना वेगवान पद्धतीने टार्गेटला निशाणा करावयाचे असते. यामध्येही तीन सीरिजमध्ये नेमबाज ३० शॉट मारतात. मनू हिने पहिल्या सीरिजमध्ये १०० गुणांची, दुसऱ्या सीरिजमध्ये ९८ गुणांची आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ९८ गुणांची कमाई केली.

अनंत जीत २६व्या स्थानावर

पुरुषांच्या स्कीट प्रकाराच्या पात्रता फेरीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. अनंत जीत नारूका याने यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. पहिल्या दिवसअखेर त्याने ६८ गुणांची कमाई करीत २६वे स्थान पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()