मेरी कोमकडून Vinesh Phogat वर अप्रत्यक्ष टीका; वजनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही खेळाडूचीच

Paris olympic 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला वजन अपात्रतेमुळे पदकाला मुकावे लागले होते. विनेशच्या या वादावर आता भारतीय दिग्गज बॉक्सर मेरी कोमने तिची कानउघडनी केली आहे.
Mary Kom
Mary Komesakal
Updated on

Mary Kom reacts on Vinesh Phogat Controversy: नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जास्त वजनामुळे अंतिम सामना खेळण्यास ती अपात्र ठरली होती. फोगटच्या अपात्रतेवर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली मते मांडली. काहींनी तिचे समर्थन केले तर काहींनी तिच्यावर टीका केली. अशातच दिग्गज बॉक्सर आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमने या प्रकरणात विनेशची कान उघडनी केली आहे.

दोन विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके आणि आशियाई गेम्स आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके जिंकलेल्या विनेशला फोगटला ऑलिम्पिकमध्ये पदक गमावले लागले होते.

Mary Kom
INDWvsNZW : भारत-न्यूझीलंड यांच्यात T20 World Cupचा सामना आज; केव्हा, कुठे Live Telecast पाहता येणार?

तिची पहिलीच लढत टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकीविरुद्ध होती, जी २०१० पासून एकही सामना हारली नव्हती. सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकही गुण न गमावता सुवर्णपदक जिंकले होते.

विनेशने पहिल्या सामन्यात ०-२ ने पिछाडीवर असताना आणि ४० सेकंदांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना ३-२ ने विक्रमी विजय मिळवला. त्यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचविरुद्ध विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव केला.

पण नंतर अंतिम लढतीपूर्वी, ५० किलो वजनी गटात जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. कारण तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते.

Mary Kom
Rashid Khan Wedding: वर्ल्ड कप नाही, तोपर्यंत लग्न नाही! असं म्हणणाऱ्या राशिदने केला निकाह; Video Viral

फोगटच्या या वादावर भाष्य करताना मेरी कोमने सांगितले की वजन व्यवस्थापन ही खेळाडूची जबाबदारी आहे. पीटीआयशी बोलताना मेरी कोम म्हणाली, "मला विनेशच्या घटनेबाबत खूप निराशा वाटली. मी देखील गेली अनेक वर्षे वजन व्यवस्थापन केले आहे. वजन कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. याबबतीत मी कोणाला दोष देऊ शकत नाही."

" हे मी विनेशनच्या बाबतीत म्हणत नसून हे माझ्यासाठीही लागू होते. जर मी वजन कमी केले नाही तर मी खेळणार कशी? मी पदक जिंकण्यासाठी जाते त्यासाठी मला वजन कमी करणे गरतजेचे आहे." मेरी कोम पुढे म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.