Vinesh Phogat: विनेशची मॅच पाहून नीरज चोप्राची भारी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला गोल्डन बॉय

Neeraj Chopra on Vinesh Phogat Paris olympic 2024 : विनेश फोगाटने आज अविश्वसनीय कामगिरी करताना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला पहिल्याच सामन्यात चीतपट करून पदकाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला.
vinesh phogat Neeraj Chopra
vinesh phogat Neeraj Chopraesakal
Updated on

India at Paris Olympic 2024 Vinesh Phogat Live : पॅरिस ऑलिंम्पिक स्पर्धेतील मंगळवारचा दिवस भारतीयांना अनन्य आनंद देणारा ठरला.. गोल्डन बॉय नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) पहिल्याच भालाफेकीत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. तेच दुसरीकडे कुस्तीपपटू विनेश फोगाट हिने मैदान गाजवले. विनेशने पहिल्याच सामन्यात सुवर्णपदक विजेत्या जपानच्या सुई सुसाकीला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विनेशच्या या विजयाने जग स्तब्ध झाले असताना नीरजनेही तिचे कौतुक केले...

ऑलिम्पिक विजेतीला चीतपट केले...

विनेश फोगाटने पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल नोंदवताना टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान मोडून काढले. जपानच्या खेळाडूने २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु विनेशने उल्लेखनीय कामगिरी केली आणि ही मॅच ३-२ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

उपांत्यपूर्व फेरीत कडवी टक्कर...

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय खेळाडूला युक्रेनच्या ओक्साना लिव्हाचकडून कडवी टक्कर मिळाली. विनेशेने दुसऱ्या मिनिटाला युक्रेनच्या खेळाडूला टेक डाऊन करून २ गुण कमावले. दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा विनेशने टेक डाऊन करत ४-० अशी मजबूत केली. ओक्साना भारतीय खेळाडूचा पाय पकडून पदक दीड मिनिट असताना ओक्सानाने २ गुण घेतले. १४ सेकंद शिल्लक असताना विनेशने प्रतिस्पर्धीला मॅटवर आपटले आणि ७-५ अशी आघाडी घेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ही सुसाकी आहे तरी कोण?

  • सुसाकी एकदाही गैर जपानी खेळाडूकडून हरलेली नव्हती.

  • २०१० पासून सुसाकी फक्त ३ सामने पराभूत झाली आहे आणि त्यात विनेशचे नाव आज नोंदवले गेले आह

  • सुसाकीचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जय-पराजयाची आकडेवारी ही ८२-० अशी होती.

नीरज चोप्रा काय म्हणाला...

नीरजला जेव्हा विनेशच्या विजयाबाबत विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, हे अद्भुत आहे. सुसाकीला हरवणे ही अशक्य गोष्ट होती आणि ती विनेशने केली. तिने घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. तिने पदक जिंकावे यासाठी मी प्रार्थना करतो. ऑल दी बेस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.