Aman Sehrawat Bronze Medal Live : अमन सेहरावतने ऐतिहासिक पदक जिंकले; भारतीय कुस्तीपटूंची राखली लाज

Paris Olympic 2024 : अमन सेहरावत हा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला भारताचा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता आणि त्याने रवी दहियाला पराभूत करून हे तिकीट जिंकले होते.
aman sehrawat
aman sehrawatesakal
Updated on

Olympic 2024 Aman Sehrawat vs Darian Cruz Live : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय कुस्तीपटूंना पदकावीनाच परतावे लागेल असे वाटत असताना अमन सेहरावतने पदक जिंकले. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या रवी दहियाला पात्रता स्पर्धेत २१ वर्षीय अमनने पराभूत केले होते. त्यावेळी हा काय पदक आणणार, असाच सूर अनेकांनी आवळला होता. पण, त्याने कांस्यपदकाच्या लढतीत प्युएर्तो रोकोच्या डॅरियन क्रूझचे आव्हान सहज परतवले आणि कांस्यपदक नावावर केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे कुस्तीतील हे पहिलेच पदक ठरले. भारताच्या पदकांची संख्या सहा झाली आहे.

अमनने लहानपणीच आई-वडील गमावले. वयाच्या ११ व्या वर्षी अमन अनाथ झाला. तो १० वर्षांचा असताना त्याची आई कमलेश यांचे डिप्रेशनमुळे निधन झाले. एका वर्षानंतर अमनचे वडील सोमवीर यांनीही हे जग सोडले. अमनच्या काकांनी त्याची काळजी घेतली. पुरुष गटाच्या पहिल्या लढतीत अमनने नॉर्थ मॅकाडोनियाच्या व्हॅदिमीर इगोरोव्हचा १०-० असा पराभव केला.

aman sehrawat
Vinesh Phogat Appeal Live : विनेश फोगाटच्या मागणीवर IOC अध्यक्षांचं मोठं विधान; रौप्यपदक देणं म्हणजे...

उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर अल्बेनियाच्या झेलिमखानचे आव्हान होते आणि २०२२च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारतीय कुस्तीपटूने १२-० असे सहज पराभव केले. पण, पुढच्या फेरीत अव्वल मानांकित रेई हिगुचीने १०-० अशा फरकाने भारतीय खेळाडूला पराभूत केले. त्यामुळे अमनला आज कांस्यपदकाच्या लढतीसाठी खेळावे लागले.

डॅरियन क्रूझने पॅन अमेरिकन स्पर्धेत २०२२ व २०२३ मध्ये प्युएर्तो रिकोचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. २०२०मध्ये तो अमेरिकेकडून याच स्पर्धेत खेळला होता आणि कांस्य जिंकला होता. त्यामुळे त्याच्यासमोर अमनचा निभाव लागणे अवघडच होते. पण, अमनने २-१ अशी आघाडी घेऊन सर्वांना अचंबित केले होते. मात्र, क्रूझने दोन गुण घेऊन ३-१ अशी आघाडी मिळवली आणि त्याला अमनकडून सडेतोड उत्तर मिळाले. पहिल्या ३ मिनिटांत अमन ६-३ असा आघाडीवर होता.

ब्रेकनंतर क्रूझने अमनला मॅटवर पाडून दोन गुण घेतले होते. पण अमनचा निर्धार तो मोडू शकला नाही. क्रूझ पूर्णपणे थकलेला दिसला आणि अमनने त्याची आघाडी ८-५ अशी भक्कम केली. त्याला शेवटच्या ७० सेकंद ती टिकवायची होती. भारतीय कुस्तीपटूने जोरदार प्रदर्शन करताना १३-५ अशी आघाडी मजबूत केली आणि पदकही निश्चित केले. शेवटच्या २१ सेकंदात ही पिछाडी भरून काढणे क्रूझसाठी अशक्य होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.