Paris Olympic Zhou Yaqin : नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने ४० सुवर्णपदकांसह ४४ रौप्य आणि ४२ कांस्य असे एकूण १२६ पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले. चीनला ४० सुवर्णपदकांसह २७ रौप्य आणि २४ कांस्य पदके अशी मिळून ९१ पदके जिंकता आली. चीनसाठी एक रौप्यपदक जिंकलेली जिम्नॅस्टपटू झोयू याकिन ( Zhou Yaqin ) हिची पॅरिसमध्ये भरपूर चर्चा झाली होती. १८ वर्षीय याकिन जेव्हा पोडियमवर उभी होती तेव्हा तिच्यासोबत उभ्या असलेल्या दोन खेळाडूंनी जेव्हा मेडल दातांनी चावलं, ते पाहून याकिनला थोडं आश्चर्य वाटलं होतं. पण, त्यांनी केलं म्हणून तिनंही तसं केलं आणि तो Cute व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याकिन पुन्हा चर्चेत आली आहे.
ऑलिम्पिक जिम्नस्टपटू याकिन ही तिच्या घरी म्हणजेच चीनमध्ये परतली आहे आणि ती तिथे घरच्यांना मदत करताना दिसली. १८ वर्षीय याकिनच्या आईचे हेनग्यांग येथे रेस्ट्रॉरंट आहे आणि रौप्यपदक विजेती खेळाडू तिथे काम करताना दिसली. आईला मदत व्हावी यासाठी याकिन रेस्ट्रॉरंटमध्ये ग्राहकांसाठी जेवण घेऊन जाताना दिसली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
''ही क्यूट चायनिस जिम्नॅस्टपटू झोयू याकिन तुम्हाला आठवतेय का? ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर ती घरी परतली आणि सुट्टीत ती तिच्या घरच्यांना रेस्ट्रॉरंटमध्ये मदत करत आहे.''असे एका ट्विटर हँडलने ट्विट केले आहे.
तिच्यासारख्या चॅम्पियन्सच्या आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची भूमिका बजावते, असे एकाने कमेंट केली आहे.
याकिनचे फोटो व्हायरल होताच, तिच्या आईच्या रेस्ट्रॉरंटमध्ये खाद्यप्रेमींची रांग लागली. याकिनने ऑलिलम्पिक स्पर्धेत बिम बॅलेन्स गटात १४.१०० गुणांसह रौप्यपदक जिंकले. पात्रता स्पर्धेपेक्षा तिला ०.७६६ गुण ( १४.८६६) गुण कमी मिळाले. इटलीच्या एलिसिया डी एमाटोकडून ती पराभूत झाली. याकिनने चीनच्या ऑल राऊंड टीम आणि महिला फ्लोअर वैयक्तिक गटातही सहभाग घेतला होता, परंतु तिला आणखी एक पदक जिंकता आले नाही. याकिनने जागतिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक जिंकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.