Swapnil Kusale on Hindu Rashtra : “आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल,” असे मत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने व्यक्त केले. पुण्यात दहीहंडी उत्सवानिमित्त कुसाळेने काल एका कार्यक्रमाला भेट दिली होती.
नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याच्यानिमित्ताने ७२ वर्षानंतर ऑलिम्पिक पदक महाराष्ट्रात आले. १९५४ च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर स्वप्नीलने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले.
स्वप्नील कुसाळेने २००९ मध्ये नेमबाजीला सुरुवात केली आणि २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. स्वप्नील कुसाळे हा मध्य रेल्वेत २०१५ पासून तिकिट कलेक्टर म्हणून कार्यरत होता. ऑलिम्पिक पदकानंतर त्याला बढती मिळाली. कुसाळे याची मुंबईतील ओएसडी, स्पोर्ट्स सेल म्हणून ( OSD, Sports Cell in Mumbai) पदोन्नती करण्यात आली आहे.
स्वप्नील म्हणाला,"नेमबाजीचा सराव आणि स्पर्धा असल्यामुळे मी कधी दहीहंडी उत्सवात सहभागी झालो नव्हतो. हे मी पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपण आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण जय श्रीराम म्हणतो...लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.