Olympic Medalist स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून २ कोटींचे बक्षीस; पण वडील नाराज..

Paris Olympic 2024: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून २ कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
SWAPNIL KUSALE
SWAPNIL KUSALEESAKAL
Updated on

Swapnil Kusale: स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याला २ कोटी रूपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. परंतु,या रकमेवर स्वप्नीलचे वडील नाराज होते व त्यांनी स्वप्नीलला ५ कोटी रूपये आणि पुण्यात घर देण्याची मागणी सरकारकडे केली होती. परंतु, ,सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहून स्वप्नीलला आज २ कोटी रूपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वप्नील कुसाळेने ७२ वर्षांनंतर महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी काही दिवसांपूर्वी स्वप्नीलला देण्यात येणाऱ्या बक्षीसाची रक्कम वाढवावी अशी सरकारकडे मागणी केली होती. स्वप्नीलला ५ कोटी रुपये मिळायला हवेत व बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ फ्लॅट मिळावा जेणेकरून त्याला सहज सराव करता येईल. त्याचबरोबर पुण्यातील ५० मीटर थ्रो पोझिशन रायफल शूटिंग मैदानाला आपल्या मुलाचे म्हणजेच स्वप्नील कुसाळेचे नाव देण्यात यावे अशी स्वप्नीलच्या वडीलांची मागणी होती.

यावेळी त्यांनी हरियाणा सरकारचे उदाहरण दिले होते. हरियाणा सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्यांना ५ कोटी रुपये दिले. त्यांनी हरियाणा सरकारने दिलेल्या बक्षीसाची तुलना महाराष्ट्र सराकारच्या धोरणाशी केली. सरकारने सुवर्णपदक विजेत्याला ५ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ३ कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

सुरेश कुसळे म्हणाले, "महाराष्ट्रला या स्पर्धेत केवळ एक पदक मिळाले असताना हे प्रमाण कशासाठी? आत्तापर्यंतच्या पदक विजेत्यांपैकी स्वप्नील ऑलिम्पिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा केवळ दुसरा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात यावे." अशी सुरेश कुसाळे यांची मागणी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.