OLYMPIC RECORD! पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. त्याने पहिल्या प्रयत्नात फाऊल केले, परंतु दुसऱ्या प्रयत्नात दमदार पुनरागमन करून सुवर्णपदकावर दावा सांगितला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नीरजने पात्रता फेरीत पहिल्याच फेकीत ८९.३४ मीटर अंतर पार करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये नीरजसमोर अँडरसन पीटर्स ( ग्रेनेडा, ८८.६३ मीटर ), ज्युलियन वेबर ( जर्मनी, ८७.७६ मीटर), अर्शद नदीम ( पाकिस्तान, ८६.५९ मीटर) आणि जुलियस येगो ( केनिया, ८५.९७ मीटर) यांचे कडवे आव्हान असणार होते. गतविजेता नीरजने फायनलमध्ये आठव्या क्रमांकावर भालाफेकीला आला. टोकियोतील रौप्यपदक विजेत्या याकुब व्हॅद्लेचने पहिल्या प्रयत्नात ८०.१५ मीटर भाला फेकला. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८४.७० मीटर भाला फेकून सर्वांना चकित केले.
त्रिनिदाद अँड टोबागोच्या केशोर्न वॅलकॉटने ८६.१६ अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोदंवली. पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्याच प्रयत्नात अडखळला. जर्मनीचा ज्युलियन वेबरनेही फाऊल केला. नीरजने पहिला भाला दूर फेकला, परंतु तो पडल्याने त्याच्याकडून फाऊल झाला. पहिल्या फेरीत केशोर्न आघाडीवर राहिला. ग्रेनाडाच्या पीटर्सने दुसऱ्या फेरीत ८७.८७ मीटर भाला फेकून इतरांचे टेंशन वाढवले. अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब भाला फेक करून नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदवला.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्मलेला अर्शद हा ऑलिम्पिक फायनल खेळणारा पहिला पाकिस्तानी आहे. त्याने जागतिक मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचीही फायनल खेळली होती. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने राष्ट्रीय विक्रमासह ९०.१८ मीटरचा राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमही नोंदवला होता. ९० मीटरपेक्षा लांब भाला फेकणारा तो पहिला दक्षिण आशियाई खेळाडू ठरला होता. २०२३ मध्ये त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते आणि या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला पाकिस्तानी ठरला होता. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय २०१८च्या आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकही त्याच्या नावावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.