Olympics 2024 Badminton Live : लक्ष्य सेन ऑलिम्पिकमध्ये जिंकणार मेडल? `सुपर डेन’ विक्टर एक्सेलसेनशी सामना, जाणून घ्या कोण आहे कोणावर भारी...

Lakshya Sen vs Viktor Axelsen : लक्ष्य सेनसमोर आज बलाढ्य विक्टर एक्सेलसेनचे आव्हान
Lakshya Sen vs Viktor Axelsen
Lakshya Sen vs Viktor Axelsensakal
Updated on

Paris Olympics 2024 Badminton : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये डेन्मार्कचा `सुपर डेन’ विक्टर एक्सेलसेन फारच ताकदवान खेळाडू समजला जातो आणि भारताच्या लक्ष्य सेनला ऑलिंपिक सुवर्णपदकाच्या लढतीत खेळायचे असेल, तर याच एक्सेलसेनचे आव्हान मोडावे लागणार आहे. उपांत्य फेरीची ही लढत आज होत आहे.

एक्सेलसेनला पराभूत करायचे असेल, तर लक्ष्य सेनला कदाचित आत्तापर्यंत न केलेला असा अफलातून खेळ करावा लागणार आहे. कारण एक्सेलसेन हा त्याच्यापेक्षा अनुभवात किती तरी पटीने उजवा आहे.

Lakshya Sen vs Viktor Axelsen
तांदुळ, चहा, गाई, कार अन् घर! ऑलिम्पिक विजेत्यांना कोणता देश किती व काय काय देतो? वाचा सविस्तर

एक्सेलसेन गत ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. गेल्या काही वर्षांत त्याने प्रतिस्पर्ध्यांना संधीही न देता पराभूत केलेले आहे. ३० वर्षीय या डेन्मार्कच्या खेळाडूने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण, त्याअगोदरच्या रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदके मिळवलेली आहेत. शिवाय २०१७ आणि २०२२ मध्ये जागतिक अजिंक्यपदाचा मान मिळवलेला आहे. २०१६ मध्ये थॉमस करंडक जिंकलेला आहे. याशिवाय त्याने बॅडमिंटन फेडरेशच्या विविध जागतिक टूर स्पर्धा जिंकलेल्या आहे. डिसेंबर २०२१ ते जून २०२४ पर्यंत तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.

आमनेसामने

एक्सेलसेन आणि लक्ष्य सेन यांच्यात आत्तापर्यंत सात लढती झालेल्या आहेत. त्यातील २०२२ जर्मन ओपनमध्येच लक्ष्य सेन एक्सेलसेनला पराभूत करू शकलेला आहे. त्यामुळे ६ः१ असे समीकरण आहे.

समोर कितीही नावाजलेला खेळाडू असला, तरी त्यांच्या लौकिकाचा विचार न करता लढवय्या खेळ करण्याची लक्ष्य सेनची क्षमता आहे. या ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या जोनाथन ख्रिस्तीला गटामध्ये; तर उपांत्यपूर्व फेरीत ११ वे रँकिंग असलेल्या चोऊ यांना पराभवाचा धक्का दिलेला आहे.

Lakshya Sen vs Viktor Axelsen
Paris Olympic 2024 : लढत सोडणाऱ्या कारिनीला मिळणार बक्षीस; वादग्रस्त लढतीत निषेधाचा झेंडा रोवणाऱ्या बॉक्सरप्रती सहानुभूती

एक्सेलसेन कितीही ताकदवाव खेळाडू असला, तरी यंदाचा मोसम त्याच्यासाठी फलदायी ठरलेला नाही. हीच लक्ष्य सेनसाठी जमेची बाजू असू शकेल. यंदाच्या मोसमात त्याला मलेशिया ओपन या एकमेव स्पर्धेचे विजेतेपद त्याला मिळवता आलेले आहे. गुडघादुखापतीने त्याला यंदा त्रास दिलेला आहे. सिंगापूर ओपनमध्ये त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर इंडोनेशिया ओपनमधून त्याला माघार घ्यावी लागली होती.

एक्सेलसेनच्या तुलनेत तरुण असलेला लक्ष्य सेन अधिक तंदुरुस्त आहे. त्याचा बचाव चांगला आहे आणि चपळतेमुळे तो पूर्ण कोर्ट कव्हर करू शकतो; तसेच त्याचा फटक्यांमधील वेगही जोरदार आहे. यात सातत्य राहिले, तर लक्ष्य सेन बाजू मारू शकतो. मात्र दोघांच्या उंचीत अधिक फरक आहे. एक्सेलसेनची उंची १.९४ मीटर आहे. त्यामुळे त्याचे स्मॅश अधिक उंचावरून येतात.

उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात एक्सेलसेनच्या क्षमतेची परीक्षा झालेली नाही. उपउपांत्यपूर्व फेरीत त्याला पुढे चाल मिळाली होती; मात्र उपांत्य फेरीत त्याच्यासमोर माजी जागतिक विजेता लोह केन येव हा खेळाडू होता; परंतु एक्सेलसेनने सहज विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.