India at Olympic 2024 antim panghal wrestler : विनेश फोगाटच्या अपात्रतेचा धक्का पचवणे भारतीयांना जड जात असताना ५३ किलो वजनी गटात अंतिम पंघालने आणखी एक धक्का दिला. खरं तर विनेश फोगाट ५३ किलो वजनी गटातून खेळते, परंतु तिला ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला. विनेशच्या अपात्रतेच्या बातमीने मन दुःखी झालेले असताना अंतिमच्या पराभवाने कुस्तीप्रेमींनी राग व्यक्त केला.
अंतिमने २०२३ च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. भारताला २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत पदक मिळवून देणारी अंतिम ही पहिलीच खेळाडू आहे. आशियाई स्पर्धा व आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २०२३ मध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तुर्कीच्या झेयनेप येतगीलने पहिल्याच पकडीत अंतिमविरोधात ४ गुण घेतले. पहिल्या एक मिनिटांत तुर्कीच्या खेळाडूने चीतपट देत ७९ सेकंदात ही मॅच १०-० अशी जिंकली.
अंतिम तिची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळली आणि १९ वर्षीय खेळाडूचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. तिचा तुर्कीच्या खेळाडूसमोर निभाव लागला नाही. त्यात तुर्कीची खेळाडू पुढील सामन्यात पराभूत झाल्याने अंतिमचे रेपेचेज फेरीतून खेळण्याचे स्वप्नही भंगले.
विनेशने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५३ किलो वजनी गटातून सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदकंही तिने याच गटातून जिंकली होती. पण, अंतिमने भारताला ५३ किलो महिला वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेची पात्रता मिळवून दिली आणि त्यामुळे विनेशने ५० किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला.
अंतिमच्या वडिलांचे नाव रामनिवास पंघाल आणि आईचे नाव कृष्णा कुमारी आहे. रामनिवास पंघाल यांना आधीच तीन मुली होत्या. कुटुंबाला मुलगा हवा होता पण चौथी मुलगीच झाली आणि त्यामुळे तिचं नाव अंतिम ठेवले गेले. पण, आई-वडिलांनी त्यांच्या मुलीला नेहमीच पाठिंबा दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.