Shoaib Akhtar hailed Neeraj Chopra's mother: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये बहुप्रतिक्षित भालाफेरीची स्पर्धा गुरुवारी रात्री पार पडली. या स्पर्धेत अनेकांचे लक्ष भारताच्या नीरज चोप्रा आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीम यांच्यावर होते. दरम्यान, या दोघांनी चांगली कामगिरीही केली.
अर्शदने ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले, तर नीरजने त्याचा सिजन बेस्ट देत ८९.४५ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले. यानंतर सध्या या दोघांचेही कौतुक होत आहे.