भारतीय हॉकीची Olympic मधील मक्तेदारी संपली! २४ तासांत Paris 2024 मध्ये घडलं असं काहीतरी

Indian Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने Paris Olympic 2024 स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. तब्बल ५२ वर्षांनंतर सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने करून दाखवला, पण..
Indian hockey team Olympic
Indian hockey team Olympicesakal
Updated on

Paris Olympic 2024 Indian Hockey Team : भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. स्पेनविरुद्धच्या लढतीत भारताने वर्चस्व राखताना ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील हॉकीमधील १३ वे पदक निश्चित केले. ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे सर्वाधिक ८ सुवर्णपदकं ही टीम इंडियानेच पटकावली आहेत. महिला संघाला एकही पदक जिंकता आलेले नाही. काल पॅरिसमध्ये २४ तासांत असे काहीतरी घडले की, ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची मक्तेदारी संपुष्टात आली.

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ...

भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९५६ अशी सहा सुवर्णपदकं जिंकली होती. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर १९६४ व १९८० मध्ये भारताने पुन्हा सुवर्ण कामगिरी केली. १९६८, १९७२ मध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर २०२० व २०२४ अशी सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय संघाने ५२ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.

Indian hockey team Olympic
Paris Olympic मेडल विजेत्या भारतीय हॉकी टीमचं जंगी स्वागत, ढोलच्या तालावर खेळाडूंचाही ठेका; पण PR Sreejesh कुठंच का दिसला नाही?

काल पॅरिसमध्ये काय घडलं?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी मध्यरात्री नेदरलँड्स विरुद्ध जर्मनी यांच्यात पुरुष हॉकी गटातील फायनल सामना झाला. निर्धारित ६० मिनिटांत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने पेलन्टी शूट आऊट खेळवण्यात आली आणि त्यात नेदरलँड्सने ३-१ अशी बाजी मारली. नेदरलँड्सच्या पुरुष हॉकी संघाने २४ वर्षांनंतर ऑलिम्पिक गोल्ड जिंकले.

तेच ९ ऑगस्टला रात्री महिला हॉकी फायनलमध्ये नेदरलँड्स विरुद्ध चीन हा सामनाही निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटला. या सामन्यातही नेदरलँड्सने ३-१ असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. नेदरलँड्सच्या महिला संघानेही २४ वर्षांनी ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले.

नेदरलँड्स हॉकीत टॉपर...

कालच्या दोन गोल्डने नेदरलँड्सचा ( पुरुष व महिला) हॉकीत अव्वल स्थानावर जाऊन बसवले. नेदरलँड्सच्या पुरुष हॉकी संघाने ३ सुवर्ण, ४ रौप्या, ३ कांस्य अशी एकूण १० ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. महिला संघाने ५ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्य अशी १० पदकं नावावर केली आहेत. अशा प्रकारे ऑलिम्पिक हॉकी इतिहासात नेदरलँड्सच्या नावावर ( पुरुष व महिला) एकूण ८ सुवर्ण, ६ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण २० पदकं झाली आहेत.

Indian hockey team Olympic
Indian hockey team Olympic esakal

भारत दुसऱ्या क्रमांकावर...

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्य अशी एकूण १३ पदकं जिंकली आहेत. त्याचवेळी भारतीय महिला हॉकी संघाला एकही पदक जिंकता आलेले नाही. १९८० आणि २०२० मध्ये त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे काल नेदरलँड्सने एकूण हॉकी पदकांमध्ये भारताला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले.

Indian hockey team Olympic
PR Sreejesh भारताची 'Wall'! पळण्याचा कंटाळा, ग्रेस मार्क्सचा जुगाड ते दिग्गज हॉकीपटू...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.