भावा तुझ्यासाठी काहीपण! Neeraj Chopraसाठी पठ्ठ्याने 30 देशात केली २२ हजार किलोमिटरची 'सायकल' वारी

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धत सध्या अनेक भारतीय खेळाडूही मैदानात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान भारताचा स्टार गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिससाठी रवाना झाला आहे.
Paris 2024 Olympics Kerala Cyclist Reaches France To Cheer For Neeraj Chopra
Paris 2024 Olympics Kerala Cyclist Reaches France To Cheer For Neeraj Choprasakal
Updated on

Neeraj Chopra Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धत सध्या अनेक भारतीय खेळाडूही मैदानात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान भारताचा स्टार गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिससाठी रवाना झाला आहे. त्याने सोमवारी (२९ जुलै) त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याची पोस्ट शेअर केली.

Paris 2024 Olympics Kerala Cyclist Reaches France To Cheer For Neeraj Chopra
Manika Batra : मनिकाने रचला इतिहास! गेल्या १६ ऑलिम्पिकमध्ये जे घडलं नाही ते घडलं, चीनी साम्राज्य मोडून काढणार?

दरम्यान नीरज चोप्रासाठी एका पठ्ठ्याने जवळपास दोन वर्षांत केरळ ते फ्रान्सची राजधानीपर्यंत सायकल चालवली. फैस असराफ अली नावाच्या या चाहत्याने 15 ऑगस्ट 2022 रोजी केरळ ते पॅरिस असा सायकल प्रवास सुरू केला होता.

30 देशांचा प्रवास करून आणि अंदाजे 22,000 किलोमीटरचे अंतर कापून तो पॅरिसला पोहोचला आहे. अली 'शांतता आणि एकतेचा' संदेश देत भारत ते लंडन सायकलच्या मिशनवर निघाला होता.

Paris 2024 Olympics Kerala Cyclist Reaches France To Cheer For Neeraj Chopra
IND vs SL 3rd T20 : तिसऱ्या मॅचपूर्वी श्रीलंकेत मुसळधार पावसाचा तांडव! कर्णधार सूर्याच्या पोस्टमुळे वाढले टेन्शन

यादरम्यान 17 देशांत सायकलिंग केल्यानंतर गेल्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी दुपारी तो बुडापेस्टमध्ये थांबला होता, तेव्हा त्याला नीरज तिथेच असल्याचे समजले. अलीने केरळमधील एका प्रसिद्ध प्रशिक्षकाला फोन करून भारतीय संघाला भेटण्यास सांगितले आणि त्यानंतर त्याला नीरजला भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा नीरज मला म्हणाला की, तू लंडनला जात आहेस तेव्हा पॅरिसला ऑलिम्पिकसाठी का येत नाहीस. म्हणून त्याने तो प्लॅन थोडा बदलला आणि थेट पॅरिसला आला.

Paris 2024 Olympics Kerala Cyclist Reaches France To Cheer For Neeraj Chopra
Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनचा विजय हटविल्यानंतर नेटिझन्स संतापले

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज भारताला पदकाची सर्वात मोठी आशा आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ॲथलेटिक्समध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. यावेळीही नीरजकडून गोल्डची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()