Vinesh Phogat ने फायनलमध्ये प्रवेश केला अन् आनंदाने कोच ढसाढसा रडू लागला, Video Viral

Vinesh Phogat Paris olympic 2024 : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीतून माघार घेण्याचे दुःख मनात साठवून खेळणाऱ्या विनेशने आज इतिहास घडवला.
vinesh phogat
vinesh phogatesakal
Updated on

India at Paris Olympic 2024 Vinesh Phogat Live : भारताच्या विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये प्रवेश करताना तिने भारताचे पॅरिसमधील चौथे पदक निश्चित केले. कुस्तीत फायनल खेळणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. विनेशच्या या गगन भरारीनंतर तिच्या कोचला अश्रू अनावर झाले..

विनेशने पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल नोंदवताना टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान मोडून काढले आणि पुढील मार्ग सोपा केला. उपांत्य फेरीत तिच्यासमोर क्युबाची कुस्तीपटू गुजमन लोपेझ युस्नेयलिसचे आव्हान होते. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळावर भर दिला. विनेशचा भक्कम विरुद्ध गुजमनचा बचाव असा खेळ सुरू होता. विनेशने पहिला तांत्रिक गुण मिळवून आघाडी घेतली. पहिल्या फेरीत बचावात्मक खेळ झाला आणि विनेश १-० अशी आघाडीवर राहिली.

दुसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंकडून आक्रमणाची अपेक्षा होती. दोन्ही खेळाडू एकमेकिंचे डावपेच चांगल्या पद्धतीने ओळखून होत्या आणि त्यामुळे गुणासाठी दोघींनाही संघर्ष करावा लागला. विनेशच्या आक्रमणाला गुजमनकडून दमदार बचावाने उत्तर मिळाले. पण, विनेशने बाजी मारली आणि अप्रतिम पकड घेताना ४ गुण खात्यात जमा केले. विनेशने ५-० अशी आघाडी घेतली होती आणि शेवटच्या ७० सेकंदात ती तिला टिकवायची होती. शेवटच्या ३० सेकंदात अप्रतिम बचाव करून विनेशने फायनलमध्ये प्रवेश केला.

विनेशच्या विजयानंतर प्रशिक्षकांनाही अश्रू अनावर झाले.

कारकीर्द

  • राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला.

  • एकापेक्षा अधिक जागतिक चॅम्पियनशिप पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू.

  • लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेली पहिली भारतीय खेळाडू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.