- रोहिणी गोसावी
पॅरिसचं ऑलिंपिक आपण घरबसल्या बघतोय, त्या टीव्हीच्या चित्रांमध्ये जादुई कामगिरी करणारा आणि चित्रण ‘8K’ मध्ये आपल्या घरात पोहोचवणारा आहे एक मराठी अवलिया... रवी वेल्हाळ. त्यांना ‘8K’ थेट प्रक्षेपण तंत्रज्ञानाचं जनक मानलं जातं. म्हणजेच टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपवर चित्रीकरण ‘8K’ दिसतात, त्याचे श्रेय रवी वेल्हाळ यांना जातं.
मूळ सांगलीच्या असलेल्या रवी यांनी चित्रीकरणाच्या दुनियेत थेट प्रक्षेपणामध्ये क्रांती केली आहे. सध्या आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा घरातल्या टीव्हीवर ‘4K’ तंत्रज्ञानावर वर व्हिडिओ चित्रीकरण करतो किंवा बघु शकतो, पण रवी यांनी या ऑलिंपिकमध्ये त्याच्या पुढची म्हणजे ‘8K’मध्ये हे प्रक्षेपण सुरू केलंय. जगभरात पाच खंड आणि नऊ देशांत ऑलिंपिकच थेट प्रक्षेपण ‘8K’मध्ये बघू शकताहेत. मुंबईतल्या ‘व्हिसलिंगवूड अकॅडमी’मध्ये सध्या आपण ते बघू शकतो.
पॅरिस ऑलिंपिकमधल्या दोन स्पर्धांच्या ठिकाणी सध्या हे तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे सध्या फक्त स्टाड द फ्रॉन्स आणि रोनाल्ड गॅरोस या दोन स्टेडियममध्ये होणाऱ्या स्पर्धा ‘8K’मध्ये बघता येताहेत.
टोकियोमध्ये पहिल्यांदा प्रयोग
जेव्हा सगळीकडे ‘4K’चा बोलबाला सुरू झाला होता, पण तेव्हा हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होतं, कारण तेव्हा घरात या क्षमतेचा व्हिडिओ बघण्यासाठी जास्त बँडविड्थ असलेलं इंटरनेट कनेक्शन गरजेचं होतं, जे सामान्य घरांमध्ये नसायचं आणि ते घेणं प्रचंड खर्चिक असतं, पण आता सर्वसामान्यांच्या घरात असणाऱ्या बँडविड्थवर आपण हे व्हिडिओज बघू शकतो.
खेळांमध्ये या तंत्रज्ञानाचा फायदा किती
खेळातील निर्णय प्रक्रियेत सध्या तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर केला जातो. यातूनच निर्णय प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक झाली आहे. पंचांना कोणताही निर्णय घेताना वेगवेगळ्या कोनातून त्यांना बघता येतं आणि निर्णयात स्पष्टता येते. त्याच तंत्रज्ञानात आणखी क्रांती झाल्यानं त्याचा आणखी फायदा होईल, असं मत रवी वेल्हाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलं. या तंत्रज्ञानामुळे फुटबॉल सामन्यांत फुटबॉलवर लागलेली मातीही आपण बघू शकतो, असंही ते म्हणाले.
व्हिआरमधला दिग्गज
रवी हे गेली २३ वर्षे इंटेल या कंपनीत डिजिटल मीडिया स्टँडर्स, टेक्नोलॉजीज, ॲडवान्स मीडिया फॉरमॅट आणि इमर्सिव सिनेमा या उपक्रमांचे ते प्रमुख आहेत. तसंच व्हिज्युअल रिॲलिटीमध्ये चित्रपट बनवण्याचे जनक आहेत. त्यांनी आतापर्यंत हॉलीवूडमध्ये जवळपास १० ते १२ चित्रपट या तंत्रज्ञानामध्ये बनवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.