Chirag Shetty-Satwiksairaj Rankireddy and Tanisha Crasto-Ashwini Ponnappa
Chirag Shetty-Satwiksairaj Rankireddy and Tanisha Crasto-Ashwini PonnappaSakal

Paris Olympic 2024 Badminton: भारताचे चिराग-सात्विक ऑन 'टॉप', मात्र अश्विनी-तनिषाचं आव्हान संपुष्टात

India Badminton in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी भारताला बॅडमिंटनमध्ये कडू-गोड असे दोन्ही क्षण अनुभवायला मिळालेत.
Published on

Badminton in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी भारताला बॅडमिंटनमध्ये कडू-गोड असे दोन्ही क्षण अनुभवायला मिळालेत.

भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे पुरुषांच्या दुहेरी प्रकारात ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहिलेत. मात्र, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्तो यांना सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मंगळवारी बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीमध्ये सात्विक आणि चिराग यांचा सामना इंडोनेशियाच्या फझर अल्फियन आणि रियान मुहम्मद अर्डिआंतो या जोडीविरुद्ध झाला. या सामन्यात चिराग-सात्विक यांनी २१-१३, २१-१३ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह आता सात्विक-चिराग यांची जोडी ग्रुप सीमध्ये अव्वल क्रमांकावर आली आहे.

Chirag Shetty-Satwiksairaj Rankireddy and Tanisha Crasto-Ashwini Ponnappa
India at Paris Olympics 2024 Live - ''कृपया माझ्यावर रागवू नका!'' भारतीयांना असं का म्हणतेय मनु भाकर?

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आत्तापर्यंत त्यांची जोडी अपराजित असून ग्रुप सी मधून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आधीच निश्चित केला आहे. आता ते ग्रुप सी मध्ये अव्वल क्रमांकावर राहिल्याने त्यांच्यासाठी पुढील मार्ग सोपा ठरू शकतो.

याआधी त्यांनी पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या जोडीला पराभूत केलं होतं, तर त्यांचा दुसरा सामना जर्मनीच्या जोडीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने रद्द झाला होता.

दरम्यान, सात्विक - चिरागची दमदार कामगिरी झाली असली तरी मात्र अश्विनी-तनिषा यांच्या जोडीला मंगळवारी तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Chirag Shetty-Satwiksairaj Rankireddy and Tanisha Crasto-Ashwini Ponnappa
Paris Olympic 2024 Medal Tally- जपान अन् चीन यांच्यातील शर्यतीत फ्रान्सची एन्ट्री; भारत कितव्या स्थानी?

अश्विनी - तनिषा यांना मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या सेत्याना मापासा आणि अँजेला यू या जोडीने १५-२१, १०-२१ अशा फरकाने पराभूत केले.

त्यामुळे ग्रुप सी मध्ये अश्विनी आणि तनिषा यांची जोडी सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहिली. यामुळे त्यांचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवासही संपला. त्यांना यापूर्वी कोरिया आणि जपानच्या जोडीने पराभूत केलं आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बॅडमिंटनमध्ये भारताकडून एकेरीत लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय खेळत असून या तिघांनीही विजयासह त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.