India at Paris Olympic 2024 : खुब लढे! सात्विक-चिराग यांचा मनाला चटका लावणारा पराभव

Satwiksairaj Rankireddy/Chirag Shetty vs Aaron Chia Badminton Quarter Final Paris Olympic 2024 - भारताला गुरुवारी धक्कादायक निकाल पाहावा लागला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाचे प्रबळ दावेदार असलेली सात्विक व चिराग ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली.
RANKIREDDY Satwiksairaj -SHETTY Chirag
RANKIREDDY Satwiksairaj -SHETTY Chiragsakal
Updated on

India at Paris Olympic 2024 Badminton Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने ( Swapnil Kusale) याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले. त्यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला कडवी लढत देऊनही बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. मलेशियन जोडीने अविश्वसनीय पुनरागमन करून भारतीय जोडीला स्पर्धेबाहेर फेकले.

हॉकीत कडवी टक्कर...

पुरूष हॉकी संघाची अपराजित मालिका खंडित झाली. तगड्या बेल्जियमला कडवी टक्कर देऊनही भारताला २-१ ने पराभव पत्करावा लागला. भारताला १८व्या मिनिटाला अभिषेकने आघाडी मिळवून दिली. पण, तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने पुनरागमन केले. ३३व्या मिनिटाला स्टॉकब्रॉक्स थिबीयू व ४४व्या मिनिटाला डोहमेन जॉन यांनी गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने शेवटपर्यंत बरोबरीचा गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांच्या वाट्याला अपयश आले. भारताचा पुढील सामना २ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

सात्विक व चिराग कडवी टक्कर

भारताच्या पुरुष दुहेरी गटात खेळणारी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. सात्विक व चिराग जोडीने पहिला गेम १७ मिनिटांत २१-१३ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडी चिआ आरोन व सोह वूई यिक यांनी चांगले पुनरागमन केले. हा गेममध्ये भारतीय जोडी ११-९ अशी आघाडीवर होती, परंतु मलेशियन खेळाडूंनी १५-१२ अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीने पुनरागमनासाठी जोर लावला, परंतु मलेशियन जोडीने सलग सहा गुण घेताना हा गेम २१-१४ असा जिंकला.

सामना १-१ असा बरोबरीत आल्याने निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीची कसोटी लागणार हे निश्चित होते. मलेशियन जोडीने पहिले दोन गुण घेतले. मलेशियन खेळाडू भारतीय जोडीला नेट जवळ खेळण्यास भाग पाडून त्यांच्याकडून चुका करून घेत होती. चिराग-सात्विकला स्मॅश खेळण्यापासून मलेशियन खेळाडूंनी रोखले होते. पण, चिराग-सात्विकने संधीची वाट पाहून खेळ उंचावला आणि १०-९ अशी आघाडी मिळवली. यानंतर मनोबल उंचावलेल्या भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी केली. मलेशियन जोडीला ते कोर्टवर अक्षरशः नाचवताना दिसले. मलेशियन खेळाडू सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हते आणि त्यांनी रॅलीत जबरदस्त खेळ केला व गेम १४-१४ असा बरोबरीत आणला.

दोन्ही देशांच्या खेळाडूंची खेळ चाहत्यांची उत्सुकता वाढवून ठेवत होता. मलेशियन जोडीने १८-१६ अशी आघाडी घेऊन भारतीय जोडीला दडपणाखाली आणले. त्यांच्याकडून चुका झाल्या. मलेशियना २१-१६ असा गेम जिंकून भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.