हे कसं काय? ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूने पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत जिंकले पदक; Olympic 2024 मध्ये इतिहास घडला

Paris Olympic Henry Fieldman - ग्रेट ब्रिटनचा संघ १० सुवर्ण, १२ रौप्य व १६ कांस्य अशा एकूण ३८ पदकांसह पदकतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. त्यापैकी रोईंगमधील पदक चर्चेचं कारण ठरत आहे.
Henry Fieldman
Henry Fieldman esakal
Updated on

British Rower Henry Fieldman created history - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एक वेगळाच इतिहास रविवारी लिहिला गेला. ग्रेट ब्रिटनचा नौकानयनपटू हेन्री फिल्डमॅन हा पुरुष व महिला क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. फिल्डमॅन हा ग्रेड ब्रिटनच्या महिला नौकानयन संघात Cox म्हणजेच मार्गदर्शक म्हणून सहभागी झाला होता. ग्रेट ब्रिटनच्या महिला संघाने कांस्यपदक जिंकले. तीन वर्षांपूर्वी फिल्डमन याने पुरुष संघाकडून याच क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

२०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जागतिक रोईंगमधील नियमांत काही बदल केले गेले. यामध्ये Coxes म्हणून पुरुष किंवा महिला अशा कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली. त्यामुळे ८ महिला स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिल्डमॅन ग्रेट ब्रिटनच्या रोइंग संघात दिसला.

हेन्री फील्डमॅन कोण आहे?

३५ वर्षीय हेन्री फील्डमॅन हा ग्रेट ब्रिटन रोइंग संघाचा Coxes आहे. त्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या आठ जणांच्या संघासोबत पहिले ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले होते आणि त्याने दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने संघ महिलांच्या ८ जणींच्या संघाला मार्गदर्शन करताना दुसरे ऑलिम्पिक कांस्य जिंकले. त्यामुळे पुरुष व महिला स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.

रोइंग Coxes म्हणजे काय?

कॉक्सस्वेन हा रोइंग टीमचा अविभाज्य सदस्य आहे आणि जो नौका वल्हवत नाही. तो त्याच्या संघाला मार्गदर्शन करतो. कॉक्सस्वेन हा संघाला कठीण परिस्थितीत प्रेरित ठेवण्याचे काम करतो आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. यूजीन रोइंग क्लबच्या मते, तो 'नौकेचा मेंदू' असतो आणि शर्यतींमध्ये रणनीती अंमलात आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

ग्रेट ब्रिटनच्या संघात कोण होते?

ग्रेट ब्रिटनच्या ज्या आठ महिलांनी कांस्पदक मिळवले त्या खेळाडू : हेडी लाँग, रोवन मॅकेलर, हॉली डनफोर्ड, एमिली फोर्ड, लॉरेन इर्विन, इव्ह स्टीवर्ट, हॅरिएट टेलर आणि ॲनी कॅम्पबेल-ओर्डे. यांमनी ५:५९.५१ मिनिटांसह कांस्यपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.