Paris Olympic 2024 Closing Ceremony: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा बघता बघता शेवट जवळ आला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये या स्पर्धा गेली १८ दिवस सुरू आहे. जगभरातून हजारो खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली.
त्यातील काही खेळाडूंनी प्रतिष्ठीत ऑलिम्पिक पदक मिळवण्याचा कारनामा केला. आता ११ ऑगस्ट रोजी या ऑलिम्पिक स्पर्धेची अखेर होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ ११ ऑगस्टला रात्री होणार आहे. या समारोप समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून नेमबाज मनू भाकर आणि हॉकी गोलकिपर पीआर श्रीजेश यांची निवड झाली आहे.