Paris Olympic 2024 : Argentina -मोरोक्को लढतीत राडा; बरोबरीचा गोल नाकारला, मेस्सीला धक्का बसला

Paris Olympic 2024 Argentina vs Morocco - ऑलिम्पिक स्पर्धेतील अर्जेंटिना विरुद्ध मोरोक्को हा फुटबॉल सामना वादग्रस्त ठरला. जवळपास ४ तास हा सामना खेळवला गेला आणि त्यातही अर्जेंटिनाकडून झालेला बरोबरीचा गोलही नाकारला गेला.
Paris Olympic 2024 controversy argentina vs morocco
Paris Olympic 2024 controversy argentina vs moroccosakal
Updated on

Paris Olympic 2024 Argentina vs Morocco - मँचेस्टर सिटीच्या ज्युलियन अल्वारेझसारख्या खेळाडूचा समावेश असलेल्या अर्जेंटिनाच्या संघाला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मोरोक्कोकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांच्या पहिल्या दिवशी चाहत्यांनी खेळपट्टीवर आक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वाद झाला.

मोरोक्कोच्या सौफियाने रहीमीने ४५+२ मि. आणि पेनल्टी ( ४९ मि.) असे दोन गोल केले. ६८व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी सिमॉन गियूलिनोने गोल केला आणि अतिरिक्त वेळेच्या १६व्या मिनिटाला मेडिना ख्रिस्टियनने बरोबरीचा गोल केला. पण, जे व्हायचे नव्हते ते झाले.

अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर प्रेक्षकांनी बाटल्या आणि वस्तू फेकण्यास सुरूवात केली आणि चाहत्यांनी स्टेडियमवर आक्रमण केले, ज्यामुळे अधिकाऱ्यांना सामना काही काळासाठी स्थगित करावा लागला. सुमारे दोन तासांनंतर संघ रिकाम्या स्टेडियममध्ये परत आले आणि काही काळ खेळून सामना पूर्ण केला गेला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर, अर्जेंटिनाचा बरोबरीचा गोल ऑफसाइड म्हणून नाकारण्यात आला आणि मोरोक्कोला विजयी घोषित केले गेले.

Paris Olympic 2024 controversy argentina vs morocco
Paris Olympic 2024: भारतीय महिला तिरंदाजी संघाची भरारी, दुध विक्रेत्या बापाची लेक चमकली

अर्जेंटिनाचे प्रशिक्षक जेवियर मास्चेरानो यांनी या संपूर्ण फियास्कोला सर्कस म्हटले. “माझ्या आयुष्यात मी पाहिलेली सर्वात मोठी सर्कस,” असे ते सामन्यानंतर म्हणाले. अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीत “अविश्वसनीय,” असे लिहून आश्चर्य व्यक्त केले. कोपा अमेरिका विजेत्या अर्जेंटिनाच्या दुसऱ्या फळीचा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे.

दरम्यान, क गटातील सामन्यात स्पेनने २-१ अशा फरकाने उझबेकिस्तानचा पराभव केला. मार्क पुबिलने २९व्या मिनिटाला स्पेनला पहिला गोल करून दिला. त्यानंतर ४५+३ मिनिटाला पेनल्टीवर एल्डर शोमुरोडोव्हने गोल करून उझबेकिस्तानला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोर लावला, परंतु ६२व्या मिनिटाला सर्गिओ गोमेझच्या गोलने स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनने ही आघाडी कायम राखताना विजय पक्का केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.