Paris Olympic 2024 Day 5: पीव्ही सिंधू, मनिका बत्रा अन् लवलिना बोर्गोहेनही उतरणार मैदानात, पाहा पाचव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 31th July: पाचव्या दिवशी बॅडमिंटन, घोडेस्वारी, तिरंदाजी, बॉक्सिंग, टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या दिवसाचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या
India in Paris Olympic Day 5
India in Paris Olympic Day 5Sakal
Updated on

Paris Olympic 2024 Schedule on 31th July : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिल्या चार दिवसात दोन पदके आली आहेत. आता पाचव्या दिवशीही नेमबाजी, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तिरंदाजी, बॉक्सिंग, टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

पाचव्या दिवशी म्हणजे बुधवारी नेमबाजीत १५ मीटर रायफल ३ पोझिशनची क्वालिफायर्स होणार आहेत. यात अश्वर्य प्रताप आणि स्वप्नील कुसळे अंतिम फेरीत जाण्यासाठी लक्ष्य भेद करताना दिसतील. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन यांचे सामने होणारेत.

India in Paris Olympic Day 5
Paris Olympic 2024, Day 4: मनू भाकर-सरबज्योतचं विक्रमी मेडल, तर सात्विक-चिराग अन् हॉकी संघाचा दणदणीत विजय; कसा होता चौथा दिवस

घोडेस्वारीच्या ड्रेसेज प्रकारात अनुश अगरवाला ऍक्शनमध्ये असेल, तर बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहेन हिचा सामना होणार आहे. तिरंदाजीमध्ये दिपीका कुमार आणि तरुणदीप राय हे अनुभवी खेळाडू निशाणा साधताना दिसतील, तर टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राही खेळताना दिसणार आहे.

याशिवाय रोइंगमधील पुरुषांच्या एकेरी स्कल प्रकारात भारताचा बलराज पनवार सेमीफायनल C/D मध्ये शर्यत करताना दिसेल. खरंतर तो पदकांच्या शर्यतीतून उपांत्यपूर्व फेरी पाचव्या क्रमांकावर राहिल्याने बाहेर झाला आहे. मात्र आता तो बुधवारी या क्रीडा प्रकारात त्याचं स्थान निश्चित करण्यासाठी पदकांच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या स्पर्धकांशी शर्यत करेल.

India in Paris Olympic Day 5
Paris Olympic 2024: काय सांगता! ७ महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिने 'तलवार' हाती घेतली अन् ऑलिम्पिकमध्ये लढली

पाचव्या दिवसाचं वेळापत्रक (३१ जुलै)

नेमबाजी

  • महिला ट्रॅप क्वालिफायर्स दुसरा दिवस (दुपारी १२.३० वाजता) (राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग)

  • महिला ट्रॅप फायनल (संध्याकाळी ७ वाजता)(जर पात्र ठरले तर)

  • पुरुष ५० मीटर रायफल ३ पोझिशन क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता) (ऐश्वर्य प्राताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे)

बॅडमिंटन

  • महिला एकेरी (दुपारी १२.५० वाजल्यापासून) (पीव्ही सिंधू)

  • पुरुष एकेरी (दुपारी १.४० वाजल्यापासून) (लक्ष्य सेन)

  • पुरुष एकेरी (रात्री ११.०० वाजता) (एचएस प्रणॉय)

रोइंग

  • पुरुष एकेरी स्कल सेमीफायनल C/D (दुपारी १.२४ वाजता) (बलराज पनवार)

घोडेस्वारी

  • ड्रेसेज वैयक्तिक ग्रँड प्रिक्स दुसरा दिवस (दुपारी १.३० वाजता) (अनुश अगरवाल्ला)

टेबल टेनिस

  • महिला एकेरी राऊंड ऑफ ३२ (दुपारी २.३० वाजता) (श्रीजा अकुला)

  • महिला एकेरी राऊंड ऑफ १६ (रात्री ८.३० वाजता) (मनिका बत्रा)

बॉक्सिंग

  • महिला ७५ किलो वजनी गट राऊंड ऑफ १६ (दुपारी ३.५० वाजता) (लवलिना बोर्गोहेन)

  • पुरुष ७१ किलो वजनी गट राऊंड ऑफ १६ (मध्यरात्री १२.३४ वाजता (१ ऑगस्ट) (निशांत देव)

तिरंदाजी

  • महिला वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ (दुपारी ३.५६ वाजल्यापासून) (दिपीका कुमारी)

  • महिला वैयक्तिक राऊंड ऑफ ३२ (दुपारी ४.३५ वाजल्यापासून) (जर पात्र ठरली तर)

  • पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ (रात्री ९.२९ वाजता) (तरुणदीप राय)

  • पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ३२ (रात्री १०.०७ वाजता) (जर पात्र ठरला तर)

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()