Video: नेमबाज, ऑलिम्पिक पदक विजेती अन् डान्सर! Manu Bhaker ने विद्यार्थिनींसोबत धरला ठेका

Manu Bhaker Dance Video: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरचा सध्या वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. अशाच एका कार्यक्रमात तिने विद्यार्थिंनींबरोबर ठेका धरल्याचे दिसले होते.
Manu Bhaker Dance
Manu Bhaker DanceSakal
Updated on

Manu Bhaker Video: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा भारतीय नेमबाज मनू भाकरने गाजवली. मनू भाकरने जुलै-ऑगस्टदरम्यान झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकली. तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिला गटात कांस्य आणि मिश्र गटात सरबज्योतसह कांस्य पदक जिंकलं.

तिच्या या यशानंतर तिचे भारतात जंगी स्वागत झाले. तिच्यावर भारतात आल्यानंतर बक्षीसांचा वर्षाव तर होत आहेच, पण वेगवेगळ्या ठिकाणी सन्मानही करण्यात येत आहे.

अशाच एका स्वागत समारंभात तिने तिच्यातील नृत्य कौशल्यही दाखवले आहे. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. वेलाम्मल नेक्सस ग्रुपकडून नुकताच तिचा गौरव करण्यात आला. यावेळी काही शाळकरी मुलींबरोबर ती नाचताना दिसत आहे. ती आणि तिच्याबरोबर नाचणाऱ्या मुलीही यावेळी अगदी आनंदी दिसत आहेत.

Manu Bhaker Dance
Paris Olympic Manu Bhaker: 'मला आता जेवायचंय...', तिसरं पदक हुकल्यानंतर मनू भाकर काय म्हणाली? आईसाठीही दिला खास संदेश
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.