India at Paris Olympics 2024 Live - अपराजित भारत! कर्णधार हरमनप्रीतचा ऑलिम्पिकमध्ये पराक्रम

Paris Olympic 2024 Hockey - भारतीय पुरुष हॉकी संघाने ब गटातील पहिल्या दोन सामन्यांत पिछाडीवरून मुसंडी मारलेली पाहायला मिळाली...
Hockey INDIA vs Ireland
Hockey INDIA vs Irelandsakal
Updated on

India at Paris Olympics 2024 Live Hockey Ind vs Ire - भारतीय पुरूष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मंगळवारी आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने २ गोल करून या विजयात पुन्हा सिंहाचा वाटा उचलला. या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत ( SINGH Harmanpreet) अव्वल स्थानी पोहोचला आहे. ब गटातील ३ सामन्यांतील भारताचा हा दुसरा विजय ठरला आणि ते ७ गुणांसह बेल्जियम व ऑस्ट्रेलिया यांच्यापुढे निघून गेले आहेत. पण, या दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने खेळले आहेत.

गुरजंत सिंग व मनदीप सिंग यांनी आयर्लंडच्या बचावफळीला पूर्ण हैराण केले आणि दोघांचा ताळमेळ पाहून प्रतिस्पर्धी चक्रावले. गोल करण्यासाठी मनदीपने वन टू वन स्थिती निर्माण केली होती आणि चेंडू रोखण्यासाठी आयर्लंडचा गोलरक्षकाला पुढे यावे लागले. त्याची चूक भारताच्या पथ्यावर पडली आणि भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. हरमनप्रीत सिंगने यावर सहज गोल करून भारताला ११व्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच पहिला गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने वर्चस्व गाजवले.

ब्रेकमध्ये आयर्लंडचे कोच भारताचे डावपेच हाणून पाडणाच्या टीप्स खेळाडूंना दिसले. पण, भारताचे आक्रमक शांत करण्यात ते अपयशी ठरताना दिसले. खेळाडू सातत्याने आयर्लंडच्या सर्कलमध्ये हल्लाबोल करत होते. तरीही पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात येत असलेल्या अपयशाची मालिका याही सामन्यात दिसली आणि पहिल्या १५ मिनिटांत तीन कॉर्नर गमावले. मात्र, १९व्या मिनिटाला हरमनप्रीतने कॉर्नरवरून आलेला चेंडू वेगाने गोलजाळीत पाठवला. भारताने २-० अशी आघाडी घेतली आणि या गोलसह हरमनप्रीत या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ४ गोल करणारा खेळाडू बनला.

तिसऱ्या क्वार्टरच्या पाचव्या मिनिटाला भारताने मैदानी गोल करण्याची आयती संधी गमावली, परंतु पेनल्टी कॉर्नर मिळवला. यावेळी अमित रोहिदास कॉर्नर घेण्यासाठी आला आणि त्याला गोल नाही करता आला. ४१व्या मिनिटाला आयर्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यावर गोलरक्षक श्रीजेशने अप्रतिम बचाव केला. ४४व्या मिनिटाला श्रीजेशने आयर्लंडचा आणखी एक गोल रोखला आणि आघाडी कायम राखली. त्यामुळे चौथ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडवरील दबाव वाढलेले दिसले. भारताने ही मॅच २-० अशी जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.