Paris Olympic 28 July Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा आता जोरात सुरू झाली असून पदकांसाठीचे सामनेही सुरू झाले आहेत. दरम्यान, शनिवारी भारताची कामगिरी चांगली झाली. सुरुवातीला नेमबाजांकडून काहीशी निराशा झाली असली, तरी मनू भाकरने पदकाचे स्वप्न दाखवलंय. तसेच इतर क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी निराश केलेलं नाही.
आता दुसऱ्या दिवशीही अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (२८ जुलै) भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, रोइंग, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, टेनिस आणि बॉक्सिंग अशा विविध क्रीडा प्रकारात खेळताना दिसणार आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रविवारी भारताचं पदकांचं खातं उघडू शकतं. भारताची युवा नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता पदकासाठी निशाणा साधताना दिसेल. तिची अंतिम फेरीत चांगली कामगिरी झाली, तर ती भारताला पदकांचं खातं उघडून देईल.
याशिवाय महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात भारताच्या संघाने क्वार्टर-फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे जर या फेरीत भारताने विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता येईल, त्यामुळे पदकांच्या आशा आणखी उंचावतील. तसेच या प्रकारातील पदकांच्या लढती रविवारीच होणार आहेत.
जर सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ जिंकला, तर पदक तर निश्चित होईलच, पण भारतीय संघ सुवर्णपदकासाठी खेळेल. तसेच जर सेमीफायनलमध्ये पराभव झाला, तर भारतीय संघाला कांस्यपदकाचा सामना खेळावा लागेल.
आत्तापर्यंत तिरंदाजीत भारताला एकदाही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आलेलं नाही, त्यामुळे भारतीय संघाचा प्रयत्न पदकासाठी असणार आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, बलराज पनवार, मनिका बत्रा, शरथ कमल, सुमीत नागल असे अनेक खेळाडूही रविवारी सामने खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.
१० मीटर एअर पिस्तुल फायनल (दुपारी ३.३० वाजता) (मनू भाकर) (मेडलसाठी लढत)
महिला १० मीटर एअर रायफल क्लालिफायर (दुपारी १२.४५ वाजता) (इवानिल वलारिवन आणि रमिता जिंदाल)
पुरुष १० मीटर एअर रायफल क्लालिफायर (दुपारी २.४५) (संदीप सिंग आणि अर्जुन बबुता)
महिला एकेरी (दुपारी १२.५० वाजता) (पीव्ही सिंधू)
पुरुष एकेरी (रात्री ८ वाजल्यापासून) (एचएस प्रणॉय)
पुरुष एकेरी स्कल रेपेचेज (दुपारी १.०६ वाजता) (बलराज पनवार)
महिला एकेरी राऊंड ऑफ ६४ (दुपारी २.१५ वाजता) (श्रीजा अकुला)
महिला एकेरी राऊंड ऑफ ६४ (दुपारी ४.३० वाजता) (मनिका बत्रा)
पुरुष एकेरी राऊंड ऑफ ६४ (दुपारी ३.०० वाजता) (शरथ कमल)
पुरुष एकेरी राऊंड ऑफ ६४ (रात्री ११.३० वाजता) (हरमीत देसाई)
१०० मीटर बॅकस्ट्रोक हिट्स (दुपारी ३.१३ वाजता) (श्रीहरी नटराज)
२०० मीटर फ्रिस्टाईल हिट्स (दुपारी ३.३० वाजता) (धिनीधी देसिंघू)
१०० मीटर बॅकस्ट्रोक सेमीफायनल [रात्री १.०२ वाजता (२९जुलै)] (श्रीहरी नटराज जर पात्र ठरला तर)
२०० मीटर फ्रिस्टाईल सेमीफायनल [रात्री १.२० वाजता (२९जुलै)] (धिनीधी देसिंघू जर पात्र ठरली तर)
पुरुष एकेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून) (सुमीत नागल)
पुरुष दुहेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून) (रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी)
महिला ५० किलो राऊंड ऑफ ३२ (दुपारी ३.५० वाजता) (निखत झरिन)
महिला रिकर्व्ह सांघिक क्वार्टर-फायनल (संध्या. ५.४५ वाजता) (अंकिता भकत, भजन कौर, दिपीका कुमारी)
महिला रिकर्व्ह सांघिक सेमीफायनल (संध्या. ७.१७ वाजल्यापासून) (जर पात्र ठरले तर)
महिला रिकर्व्ह सांघिक कांस्यपदकासाठी लढत (जर सेमीफायनल हरले तर) (रात्री ८.१८ वाजता)
महिला रिकर्व्ह सांघिक सुवर्णपदाकासाठी लढत (जर सेमीफायनल जिंकली तर) (रात्री ८.४१ वाजता)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.