Paris Olympic 2024 India Schedule on Day 12: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २०२४ स्पर्धेतील १२ वा दिवस म्हणजेच बुधवारचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू उतरणार असून अनेकांना मेडलच्याही संधी आहेत.
भारतासाठी चौथं पदक कुस्तीपटू विनेश फोगटने पक्कं करत इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे ती आता सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे.
याशिवाय वेटलिफ्टर मीराबाई चानू ४९ किलो वजनी गटात दुसर्या पदकासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर म्हणून तिला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
याबरोबर आज अंतिम पांघलही कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. विनेश फोगटच्या यशानंतर आता तिच्या कामगिरीकडेही सर्वांच लक्ष असणार आहे. ऍथलेटिक्समधीलही अनेक वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. महाराष्ट्राचा अविनाश साबळे स्टीपलचेसच्या फायनलसाठी मैदानात उतरणार आहे. तो स्टीपलचेसमध्ये फायनलला जाणारा पहिलाच भारतीय आहे.
याशिवाय अनु राणी अंतिम फेरीत स्थान पक्कं करण्यासाठी भालाफेक करेल. मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिलेमध्ये प्रियांका गोस्वामी आणि सुरज पन्वर सहभागी होणारेत. महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीची आज पहिली फेरी होईल, ज्यात जोती यराजी ऍक्शनमध्ये असेल.
उंच उडीमध्ये सर्वेश कुशारे, तर तिहेर उडीमध्ये अब्दुल्ला अबुबकर आणि प्रवीण चित्रावेल सहभागी होणार आहे. टेबल टेनिसमध्ये भारताचा महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये खेळताना दिसणारे. एकूणच आता आजचा दिवस भारतासाठी व्यस्त असणार आहे.
मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिले (सकाळी ११ वाजता)(प्रियांका गोस्वामी, सुरज पन्वर)
पुरुष उंच उडी क्वालिफायर्स (दुपारी १.३५ वाजता) (सर्वेश कुशारे)
महिला १०० हर्डल्स प्राथमिक फेरी (दुपारी १.४५ वाजता) (ज्योती यराजी)
महिला भालाफेक क्वालिफायर्स (दुपारी १.५५ वाजता)(अनु राणी)
पुरुष तिहेरी उडी क्वालिफायर्स (रात्री १०.४५ वाजता)(अब्दुल्ला अबुबकर, प्रवीण चित्रावेल)
पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस फायनल (मध्यरात्री १.१३ वाजचा (८ ऑगस्ट))(अविनाश साबळे)
महिला सांघिक उपांत्यपूर्व फेरी - भारत विरुद्ध जर्मनी (दुपारी १.३० वाजता)
महिला ४९ किलो (रात्री ११ वाजता)(मिराबाई चानू)
महिला ५३ किलो फ्रीस्टाईल राऊंड ऑफ १६ आणि क्वार्टरफायनल (दुपारी २.३० वाजल्यापासून)(अंतिम पंघल)
महिला ५३ किलो फ्रीस्टाईल सेमीफायनल (रात्री ९.४५ वाजल्यापासून) (जर पात्र ठरली तर)
महिला ५० किलो फ्रीस्टाईल सुवर्णपदकाचा सामना (रात्री ९.४५ वाजल्यापासून) (विनेश फोगट)
महिला पहिली फेरी (दुपारी १२.३० पासून) (आदिती अशोक व दिक्षा डागर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.