Paris Olympic 2024, Day 13: नीरजचीही नजर दुसऱ्या गोल्ड मेडलवर, तर हॉकी संघ श्रीजेशला ब्राँझची भेट देण्यास सज्ज; पाहा आजचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 8th August: गुरुवारी भारतासाठी महत्त्वाचा दिवस असून हॉकी संघ ब्राँझ पदकासाठी खेळणार आहे, तर नीरज चोप्राही सुवर्णपदक राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Paris Olympic 2024 Day 13
Paris Olympic 2024 Day 13Sakal
Updated on

Paris Olympic 2024 India Schedule on Day 13: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला गेल्या काही दिवसात चढ - उतार पाहायला मिळालेत. बुधवारी विनेश फोगट आणि मिराबाई चानू यांचं पदक थोडक्यात हुकलं, पण असं असतानाच आता गुरुवारचा (८ ऑगस्ट) दिवस भारतासाठी मोठ्या आशा घेऊन आला आहे. गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमधील १३ व्या दिवसाचे खेळ खेळवले जाणार आहेत.

गुरुवारी भारतीय हॉकी संघाला ब्राँझ पदकाचा सामना स्पेनविरुद्ध खेळायचा आहे. जर्मनीविरुद्धचा पराभव विसरून भारतीय संघ आता कसं पुनरागमन करणार हे पाहावं लागेल. याशिवाय नीरज चोप्राही त्याचं सुवर्णपदक राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याने क्वालिफायर्समध्ये ८९ मीटरपेक्षाही लांब भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केलाय.

Paris Olympic 2024 Day 13
Paris Olympic 2024: १०० ग्रॅम ते १ किलो! विनेशनंतर मिराबाई चानूला पदकाची हुलकावणी; १२व्या दिवशी बारा वाजले

याशिवाय आज महिलांच्या १०० मीटर हर्टल्सचा रेपेशॉ होणार आहे, ज्यात ज्योती याराजी सहभागी होईल.

कुस्तीमध्ये आज अमन सेहरावत आणि अंशू मलिक खेळताना दिसणार आहेत. गेल्या दोन दिवसातील घटना विसरून त्यांना कुस्ती खेळावी लागणार आहे. गोल्फमध्येही आदीती अशोक आणि दिक्षा डागर यांची दुसरी फेरी चालू होणार आहे. आता आजच्या दिवसात भारताच्या खात्यात दोन पदकं येणार का हे पाहावं लागेल.

Paris Olympic 2024 Day 13
Paris Olympic 2024: Neeraj Chopra अव्वलच...पण फायनलमध्ये असणार 'या' ११ खेळाडूंचं आव्हान, पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश

तेराव्या दिवसाचे वेळापत्रक (८ ऑगस्ट)

गोल्फ

  • महिला दुसरी फेरी (दुपारी १२.३० पासून) (आदिती अशोक व दिक्षा डागर)

ऍथलेटिक्स

  • महिला १०० हर्डल्स रेपेशॉ (दुपारी २.०५ वाजता) (ज्योती यराजी)

  • पुरुष भालाफेक फायनल (रात्री ११.५५ वाजता) (नीरज चोप्रा)

हॉकी

  • भारत विरुद्ध स्पेन - कांस्य पदकाचा सामना (संध्या. ५.३० वाजता)

कुस्ती

  • महिला ५७ किलो फ्रीस्टाईल राऊंड ऑफ १६ आणि क्वार्टरफायनल (दुपारी २.३० वाजल्यापासून) (अंशू मलिक)

  • महिला ५७ किलो फ्रीस्टाईल राऊंड सेमीफायनल (रात्री ९.४५ वाजल्यापासून) (पात्र ठरली तर)

  • पुरुष ५७ किलो फ्रीस्टाईल राऊंड ऑफ १६ आणि क्वार्टरफायनल (दुपारी २.३० वाजल्यापासून)(अमन सेहरावत)

  • पुरुष ५७ किलो फ्रीस्टाईल सेमीफायनल (रात्री ९.४५ वाजल्यापासून)(पात्र ठरला तर)

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.