Paris Olympic 2024: भारतीय महिला तिरंदाजी संघाची भरारी, दुध विक्रेत्या बापाची लेक चमकली

Paris Olympic 2024 Archery: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली. भारतीय महिला तिरंदाजी संघाने पात्रता फेरीत कमाल करून दाखवली.
India women's Archery team
India women's Archery teamsakal
Updated on

Paris Olympic 2024 Indian Archery Team - भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सकारात्मक सुरुवात केली. आज पार पडलेल्या तिरंदाजीच्या पात्रता फेरीत भारताच्या अंकिता भकत ( Ankita Bhakat), भजन कौर आणि दीपिका कुमारी ( Deepika Kumari) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या तिघींच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने सांघिक गटाच्या थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या तिघींमध्ये दुध विक्रेत्या बापाची लेक अंकिताने छाप पाडली.

भारताची अंकिता भकत हिने यावेळी बाजी मारताना ६६६ गुणांसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद करून ११ वे स्थान पटकावले. भजन कौर ( ६५९) व दीपिका कुमारी ( ६५८) या अनुक्रमे २२ व २३ व्या क्रमांकावर राहिले. भारतीय महिला संघाने एकूण १९८३ गुणांची कमाई करून सांघिक गटात चौथ्या स्थानासह थेट उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्स विरुद्ध फ्रान्स यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध खेळावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीत बाजी मारल्यास त्यांचा मुकाबला बलाढ्य दक्षिण कोरियाशी होऊ शकतो. वैयक्तिक कामगिरीत कोरियन तिरंदाजांची वर्चस्व पाहायला मिळाले. लिम सिहॉन आणि नाम सुहॉन यांनी अनुक्रमे ६९४ व ६८८ गुणांसह पहिले व दुसरे स्थान पटकावले. लिम सिहॉनने ६९४ गुणांसह विश्वविक्रमाची नोंद केली आणि त्यांनी सांघिक गटात एकूण २०४६ गुण मिळवून नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड प्रस्तापित केला.

India women's Archery team
Paris Olympic Schedule: 18 दिवस, 117 खेळाडू अन् 16 खेळ... भारतीय खेळाडूंच्या महत्त्वाच्या सामन्यांचं संपूर्ण शेड्युल

राऊंड ऑफ ६४ मध्ये भारतीय महिलांसमोरील आव्हान

  • अंकिता भकत वि. विओलेटा मैसजोर ( पोलंड)

  • भजन कौर वि सिफा कमाल ( इंडोनेशिया)

  • दीपिका कुमारी वि. रीना पर्नट ( इस्टोनिया)

कोण आहे अंकिता भकत?

अंकिता भकतने २०१७ मध्ये युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, परंतु तिला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नव्हते. तिने २०२४ मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे. अंकिता ही कोलकाता येथील असून तिचे वडील एकेकाळी दूध विकायचे. तिने वयाच्या १० व्या वर्षी व्यावसायिक तिरंदाजी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. ती सध्या जागतिक क्रमवारीत ४० व्या क्रमांकाची तिरंदाज आहे. २०२१ मध्ये तिने जागतिक क्रमावारीत १७वे स्थान पटकावून कारकीर्दितील सर्वोत्तम रँकिंग गाठले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.