Paris Olympic 2024: भारताच्या ३५ पैकी २ पदकांवरून वाद; देशाचा पहिला ऑलिम्पियन पदकविजेता भारतीय होता का?

Norman Pritchard India’s 1st Olympic medallist: ब्रिटीश ऑलिम्पियन इतिहासकारांनी भारताची 'ती' दोन पदकं ग्रेट ब्रिटनला मिळावी असा दिलेला सल्ला.
India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchard
India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchardsakal
Updated on

Was India’s 1st Olympic medallist Indian? ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात जेवढं डोकावाल, तेवढं चक्रावल्यासारखं वाटेल. प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धा ही आपल्याला अनेक प्रेरणादायी कथा सांगून जाते.. तसेच आपल्यासमोर काही गुढही उभं करतं. भारताने ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात १० सुवर्ण, ९ रौप्य व १६ कांस्य अशी एकूण ३५ पदकं जिंकली आहेत. पण, यापैकी २ पदकांवरून वर्षानुवर्षे वाद रंगलेला पाहायला मिळतोय.

स्वातंत्र्यानंतर भारताला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून दिले, ते महाराष्ट्राचे खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav ) यांनी... मात्र, त्यांच्याही आधी १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सहा दिवसांत दोन वैयक्तिक पदकं मिळाली होती आणि ती पदकं जिंकून देणारा भारतीय होता की नाही, यावरूनही वाद सुरूच आहे. १९२८ ते १९६४ हा भारताचा ऑलिम्पिक इतिहासातील सुवर्णकाळ म्हणावा लागेल. भारतीय हॉकी संघाने या कालावधीत ७ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक जिंकले. हॉकीविश्वात एक काळ भारताचा दबदबा होता.

India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchard
Paris Olympic 2024 : आयफेल टॉवरच्या धातूतून बनली ऑलिंपिकची पदके

पण, भारताला हॉकीच्या आधी मैदानी स्पर्धांमध्ये दोन पदकं मिळाली आहेत. ही पदकं जरी भारताच्या खात्यात जमा असली तरी ती ग्रेट ब्रिटनला मिळावी असा दावा काही इंग्लिश इतिहासकारांनी केला आहे. १२४ वर्षांपूर्वी भारताला नॉर्मन प्रिचर्ड ( Norman Pritchard) यांनी भारताला २०० मीटर शर्यत आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदकं जिंकून दिली. तेव्हा भारतात ब्रिटिशांचे राज्य होते आणि प्रिचर्ड यांचे मुळ ब्रिटन होते. त्यामुळेच ही पदकं भारताची म्हणावी का, असा वाद वर्षानुवर्षे सुरू आहे.

India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchard
India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchardsakal

कोण होते नॉर्मन प्रिचर्ड?

नॉर्मन प्रिचर्ड याांचा जन्म तेव्हाच्या कॅलकट्टा ( आताचा कोलकाता) येथे २३ एप्रिल १८७५ साली झाला. त्यांनी सेंट झेव्हियर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पासपोर्ट व भारतातील जन्मदाखल्यावर सहभाग घेतला होता. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात दोन रौप्यपदकं भारताला मिळवून दिली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते पहिले आशियाई खेळाडू होते. १८९७मध्ये भारतीय भूमीत अधिकृत फुटबॉल सामन्यात हॅटट्रिक करणारे पहिले खेळाडूही तेच आहेत..

India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchard
Paris Olympic 2024: प्रयत्नांती प्ररमेश्वर! उजवा हात गमावला, पण तरी हार न मानता पठ्ठ्यानं डाव्या हातानं जिंकलं सुवर्णपदक

नॉर्मन प्रिचर्ड यांनी सलग सात वर्ष बंगालच्या १०० यार्ड शर्यतीत बाजी मारली होती आणि १०० मीटर शर्यतीत १०.० सेकंदाची सर्वात जलद वेळ नोंदवण्याचा पहिला मानही त्यांनी पटकावला होता. दी टेलेग्राफने प्रिचर्ड यांचा उल्लेख त्यांच्या मॅगझीनमध्ये “the Indian champion”असा केला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही प्रिचर्ड यांनी जिंकलेल्या पदकांची नोंद ही भारताच्या खात्यात केली आहे. प्रिचर्ड हे लंडन अॅथलेटिक क्लब आणि बंगाल प्रसिडेंसी अॅथलेटिक क्लबचे सदस्य होते. दोन्ही क्लबचे प्रतिनिधित्व करताना प्रिचर्ड यांनी Amateur Athletics Association of England अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला होता.

पात्रता स्पर्धेतून त्यांनी ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले, परंतु दोन देशांच्या दोन क्लबकडून त्यांनी प्रतिनिधित्व केल्याने नेमकं कोणत्या देशाकडून ते ऑलिम्पिक खेळले, हा वादाचा मुद्दा ठरला. इतिहासकार इयान बुचानन यांनी लिहिले होते की, प्रिचर्ड यांनी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळाडू म्हणून सहभाग घेतला होता. न्यू यॉर्क टाईम्सनेही तेव्हा प्रिचर्ड यांचा उल्लेख इंग्लिशमन केला होता. त्यामुळे प्रिचर्ड यांच्या नागरिकत्वावरून वाद रंगला. ऑलिम्पिक यशानंतर प्रिचर्ड हे १९००-०२ या कालावधीत भारतीय फुटबॉल असोसिएशसनचे सचिव होते.

India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchard
India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchardsakal

१९०५ मध्ये ते व्यावसायासाठी इंग्लंडमध्ये कायमचे स्थायिक झाले. त्यानंतर अभिनय क्षेत्रातही हात आजमावले. हॉलिवूडमध्ये काम करणारे ते ( नॉर्मन ट्रेव्हर या नावाने ) पहिले ऑलिम्पियन आहेत. २००० साली इयान बुचानन यांनी प्रिचर्ड यांनी जिंकलेली पदकं ही ग्रेट ब्रिटनला देण्यात यावी असा सल्ला दिला होता. कारण, त्यांचा जन्म ब्रिटिश इंडियामध्ये झाला होता. आजही विषय छेडल्यावर हा वाद सुरू होतोच.

India's 1st Olympic medallist Story of Norman Pritchard
Paris Olympic 2024 : मेजर ध्यानचंद नव्हे तर भारताला 'या' दोघांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकून दिलीत सर्वाधिक पदकं!

भारताची ऑलिम्पिकमध्ये पहिली अधिकृत एन्ट्री...

फेब्रुवारी १९२० मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य झाल्यानंतर भारताने त्याचवर्षी ऑलिम्पिकमध्ये अधिकृत एन्ट्री घेतली. तेव्हा भारताला पदक जिंकता आले नसले तरी १९२८ मध्ये हॉकी संघाने पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले. १९५२ मध्ये खाशाबा जाधव हे स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे भारतीय खेळाडू ठरले. २००८ मध्ये अभिनव ब्रिंदाने पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आणि २०२० मध्ये नीरज चोप्राने हा पराक्रम केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.