Paris Olympic 2024 : पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतरही पूर्ण केले तिला दिलेलं वचन! हिंमत न हरता त्याने जिंकले Gold!

Inspirational story! Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या कालवाधीत आपण ऑलिम्पिक इतिहासातील काही प्रेरणादायी कथा पाहत आहोत...
Matthias Steiner Olympic gold
Matthias Steiner Olympic goldsakal
Updated on

Inspirational story! Paris Olympic 2024 : ही गोष्ट आहे, एका पतीची... जो वेटफिल्टर आहे आणि त्याने आपल्या पत्नीला ऑलिम्पिक गोल्ड देण्याचं वचन दिलं होतं.. पण, एका कार अपघातात तिचे निधन होते, पत्नीच्या निधानाने तो खचून गेला असता, परंतु तो हिमतीने उभा राहिला आणि पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करताना गोल्डन कामगिरी केली.

वेटलिफ्टर माथिआस स्टेइनर ( Weightlifter Matthias Steiner) याची ही गोष्ट... २५ ऑगस्ट १९८२ साली ऑस्ट्रीयाच्या व्हिएन्ना येथे माथिआसचा जन्म झाला. वेटलिफ्टिंग करण्याचे बाळकडू त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाले. फ्राएड्रीच स्टेइनर यांनी २० वेळा IWF-Masters World Weightlifting Champion जिंकली होती आणि २००८ मध्ये IWF 2008 Hall of Fame Survey of Leading Master Lifters या यादीत ते अव्वल होते. वडिलांना पाहून १९९५मध्ये माथिआसने वेटलिफ्टिंगला सुरुवात केली.

Matthias Steiner Olympic gold
Paris Olympic 2024 : बाबा, मी Gold जिंकलं! वडिलांचा त्याग अन् स्वप्नासाठी झटणाऱ्या लेकाची हृदयस्पर्शी गोष्ट

माथिआसला टाईप १ ची डायबिटीज होती आणि १८व्या वाढदिवसाला हे त्याला समजले. डायबिटीज असल्याचे समजण्यापूर्वी त्याच्या शरीरामध्ये तशी लक्षण दिसू लागली होती. पहिले लक्षण म्हणजे तीव्र तहान, त्यानंतर तीन महिन्यांत त्याची भूक कमी झाली आणि शरीराचे वजन ५ किलोग्रॅम कमी झाले. जेव्हा त्याची दृष्टी खराब झाली तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. पण, याही अडचणींवर मात करून तो वेटलिफ्टिंग करत राहिला.

Matthias Steiner Olympic gold
Matthias Steiner Olympic goldsakal

२००४ मधील ती पहिली भेट...

२००४ मध्ये, सॅक्सनी येथील झ्विकाऊ येथे एका जर्मन महिलेने माथिआसला टीव्हीवर वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये भाग घेताना पाहिले होते. ती माथिआसच्या प्रेमात पडली होती आणि युरोस्पोर्ट समालोचकांकडे त्याचा ईमेल पत्ता विचारत राहिली. तिने माथिआसशी संपर्क साधला आणि त्याने तिला लोअर ऑस्ट्रियामध्ये भेटण्यास होकार दिला. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लवकरच लग्न केले. तिच्यासाठी तो जर्मनीला गेला आणि त्याने जर्मन नागरिकत्वासाठी अर्ज केला.

Matthias Steiner Olympic gold
Paris Olympic 2024: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 'GOLD' ची कहाणी; फाळणीमुळे बरेच दिग्गज पाकिस्तानात गेले, तरीही युवांचा 'जोश' High!

पण, १६ जुलै २००७ मध्ये सुसॅनचे एका कार अपघातात निधन झाले आणि माथिआसच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. जिच्या प्रेमाखातर तो ऑस्ट्रीया सोडून जर्मनीचा नागरिक झाला होता आणि तिच नसल्याने कोणासाठी जगायचे असे त्याला वाटलेले. पण, माथिआसने पत्नीला काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिक गोल्ड जिंकण्याचे वचन दिले होते. तिच्या निधनानंतर माथिआसचे वजन ७-८ किलोने कमी झाले, परंतु तरीही तो हिमतीने उभा राहिला. पत्नीला दिलेले वचन पूर्ण करण्याच्या स्वप्नाने तो झपाटला होता.

२००८ च्या बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत त्याच निर्धाराने तो उतरला. स्नॅच प्रकाराच्या शेवटच्या प्रयत्नात २०७ किलो वजन उचलण्यापासून तो चुकला. त्याचवेळी कट्टर प्रतिस्पर्धी रशियाचा इव्हेगी चिगिश्चेव्हने २१० किलो वजन उचलून सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडी घेतली होती. क्लिन अँड जर्क प्रकाराच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला १० किलो अधिक भार उचलून सुवर्णपदक जिंकायचे होते आणि त्याने २५८ किलो वजन उचलले. एकूण ४६१ किलो वजनासह माथिआसने सुवर्णपदक नावावर केले आणि एक किलोच्या फरकाने रशियन खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सुवर्णपदक जिंकताच त्याला अश्रू अनावर झाले. पोडियमवर जेव्हा सुवर्णपदक हाती आले तेव्हा त्याने खिशातून पत्नीचा फोटो काढला आणि वचन पूर्ण केल्याचे जणू तिला सांगू लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.