Paris olympic games 2024 Gianmarco Tamberi - सीन नदी तीरावर पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा पार पडला... २०६ देशांतून जवळपास ११ हजार खेळाडू व त्यांचे सपोर्ट स्टाफ सदस्य या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहे आणि त्यांचे भव्य स्वागतही केले गेले. पण, या उद्घाटन सोहळ्यामुळे एका खेळाडूची कोंडी झाली आहे आणि त्याला सोशल मीडियावरून बायकोची माफी मागावी लागली.
उद्घाटन समारंभात इटालियन उंच उडीपटू जियानमार्को तांबेरीने आपल्या पत्नीची माफी मागितली आहे. त्याने लग्नाची अंगठी हरवली आहे. ३२ वर्षीय विश्वविजेता तांबेरी इटलीसाठी उद्घाटन सोहळ्यात ध्वज फडकवत होता आणि त्याच्या खेळाडूंना घेऊन जाणारी बोट सीन नदीच्या ब्रिजच्या खाली गेली, जेव्हा त्याच्या बोटातून अंगठी पाण्यात पडली.
त्यानंतर बिचाऱ्याची अवस्था इतकी वाईट झाली की त्याने इस्टापोस्ट लिहून पत्नी चियारा बोनटेम्पी तांबेरीची जाहीर माफी मागितली. त्याने लिहिले की, "मला माफ करा माझ्या प्रिये, मला माफ करा." त्याने या दुर्घटनेसाठी "खूप किलो वजन कमी करण्याला" आणि "अती उत्साह" यांना दोष दिला. तो पुढे रोमँटिक होत म्हणाला,"आपल्या लग्नाची अंगठी हरवण्यासाठी यापेक्षा चांगल्या जागेची कल्पना मी करू शकत नाही. अंगठी आता "प्रेमाच्या शहराच्या नदीच्या पात्रात कायमची राहणार आहे."
त्याने नंतर पत्नी चियारा हिलाची तिची अंगठी या नदीत फेकण्याचा सल्ला दिला. तो पुढे लिहितो,"चियारा तू पम तुझी अंगठी या प्रेमाच्या नदीत फेक मग आपण कायमचे एकत्र राहू आणि पुन्हा लग्न करण्यासाठी आणखी एक निमित्त असेल. केवळ तुम्हीच याला काहीतरी रोमँटिक बनवू शकता.'' या जोडीने सप्टेंबर २०२२ मध्ये लग्न केले.
तांबेरी तीन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती एरियाना एरिगो सोबत इटलीचा ध्वज फडकावत होता, जेव्हा अंगठी घसरली, बोटीतून उसळली आणि नदीत नाहीशी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.