Vinesh Phogat disqualification: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. मात्र अंतिम सामन्याआधी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक भरलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तिला सुवर्णपदकासाठी अंतिम सामना खेळताही आला नाही.
यानंतर या निर्णयाविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती. यावर आता १३ ऑगस्ट रोजी निकाल समोर येणार आहे.