India at Paris Olympics 2024 Live - ऑलिम्पिक गाजवणाऱ्या मनु भाकरचे प्रशिक्षक ३ वर्षांपासून बेरोजगार, जसपाल राणांची व्यथा

Manu Bhaker in Paris Olympic 2024 - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
Manu Bhaker's coach Jaspal Rana
Manu Bhaker's coach Jaspal Ranasakal
Updated on

Manu Bhaker Coach in Paris Olympic 2024 - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची २२ वर्षीय नेमबाज मनु भाकर हिने ऐतिहासिक कामगिरी केली. मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटात ( सरबजोत सिंग) अशी दोन कांस्यपदकं नावावर केली. स्वातंत्र्य भारतानंतर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी मनु ही पहिली भारतीय खेळाडू आहे. मनु पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल गटात सहभाग घेणार आहे. एकिकडे मनु भाकर इतिहास घडवत असताना तिचे कोच जसपाल राणा ( Jaspal Rana) यांना भारतात परतल्यावर नोकरीची चिंता लागली आहे.

जसपाल राणा यांनी १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यांनी १० मीटर व ५० मीटर नेमबाजीत सहभाग घेतला होता. त्यानंतर ते ऑलिम्पिक स्पर्धा खेळले नाही, परंतु २०२४ मध्ये ते मनु भाकर हिच्या आग्रहाखातर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आले.

Manu Bhaker's coach Jaspal Rana
India at Paris Olympics 2024 Live: Manu Bhaker भारतासाठी तिसरं पदकंही जिंकणार! वाचा तिची मॅच कधी होणार

''मनु भाकर माझ्याकडे मदत मागायला आली होती आणि मी इथे तिच्या मदतीसाठीच आलोय,''असे राणा यांनी मनुने पहिले कांस्यपदक जिंकल्यानंतर सांगितले होते. ''देशासाठी मी हे आव्हान स्वीकारलं. जर मी एका नेमबाजाला मदत करू शकलो, तर हे मी माझे कर्तव्य व भाग्य समजतो. हे पदक भारताचे आहे,'' असेही ते म्हणाले.

पण, राणा यांना मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ते मनुला वैयक्तिक कोच म्हणून प्रशिक्षण देत आहेत आणि ते राष्ट्रीय कोच नाही. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे मनुला फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता आणि त्यावेळी राणा यांना खलनायक ठरवले गेले.

''टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जे मला शिवीगाळ करत होते, मला खलनायक ठरवत होते, त्यांना मी सांगू इच्छितो की मी तेव्हा टोकियोत उपस्थितही नव्हतो. आज त्याच लोकांना माझी मुलाखत हवी आहे. काही हरकत नाही, मी मुलाखत देतो. पण, ही लोकं माझ्या आयुष्यात झालेले नुकसान भरून काढतील का?,''असा सवाल राणा यांनी केला.

Manu Bhaker's coach Jaspal Rana
Manu Bhaker's coach Jaspal Ranasakal

राणा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. ते म्हणाले,''मनु आता स्टार आहे. मी बेरोजगार प्रशिक्षक आहे. मी आता कोणीच नाही. मनुने मला मदत करण्यास सांगितली अन् मी इथे आलो. मला लवकरच नोकरी शोधावी लागेल. मागील तीन वर्ष माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. मला हे सांगायचे नव्हते, परंतु तुम्हाला माझी स्टोरी हवी होती. मग ऐका... ''

Manu Bhaker's coach Jaspal Rana
Manu Bhaker's coach Jaspal Ranasakal

''माझ्या आयुष्यात काय लिहिलं आहे, याची मला कल्पना नाही. मी भारतात परतण्याची वाट पाहतोय. मनु तिची शेवटची मॅच खेळेपर्यंत मी तिच्यासोबत आहे. हे मला तुम्ही विचारलं, म्हणून मी सांगितले. मला नोकरी हवीय... मागील ३ वर्षांपासून मी बेरोजगार आहे,'' असे राणा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.