India at Paris olympics 2024 Live : Ramita Jindal ०.३ गुणांनी पदकाच्या शर्यतीतून झाली बाद; शूट ऑफमध्ये हरली

India at Paris olympics 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रविवारी मनू भाकरने ( Manu Bhaker) भारताचं पदकांचे खातं उघडले आणि इतिहास घडवला. ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
ramitajindal
ramitajindalsakal
Updated on

India at Paris olympics 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रविवारी मनू भाकरने ( Manu Bhaker) भारताचं पदकांचे खातं उघडले आणि इतिहास घडवला. ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. मनूने पदकाची सुरुवात करून दिल्यानंतर सोमवारी भारताचे नेमबाज अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ( Ramita Jindal) हे पदकासाठी निशाणा साधताना दिसले. पण, रमिता शूट ऑफमध्ये ०.३ गुणांच्या फरकाने मागे पडली.

रमिताने ( Ramita Jindal ) महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता ( 10m Air Rifle Women's Final Results) फेरीत पाचवे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी रमिता ही दुसरी भारतीय नेमबाज आहे. यापूर्वी २००० मध्ये सुमा शिरूर यांनी या गटाची फायनल गाठली होती. विशेष म्हणजे शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली रतिमाने पॅरिसमध्ये ही झेप घेतली आहे. अर्जुन याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली आहे.

ramitajindal
Polio मुळे पायातील त्राण गेले, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या खचला नाही; पॅरिसमध्ये पदकावर साधणार 'नेम'!

रमिताने पहिल्या टप्प्यातील पहिल्या सीरिजमध्ये ५२.५ गुणांसह चौथे स्थान निश्चित केले होते. पण, दुसऱ्या सीरिजमधील पहिल्या ३ शॉट्समध्ये १०.४, १०.१ व १०.७ असे गुण घेवून ती सहाव्या क्रमांकावरून पुन्हा चौथ्या क्रमांकावर पोहोचली. मात्र, सहाव्या शॉट्समध्ये तिचे सातत्य ढासळले आणि ९.७ गुणांमुळे तिची सातव्या स्थानी घसरण झाली. १० शॉट्सनंतर एलिमिनेशन राऊंड सुरू झाला आणि ११ व्या व १२ व्या शॉट्सवर भविष्य अवलंबून होते. तिने १०.४ व १०.५ गुणांचा वेध घेताना सहाव्या क्रमांकाच्या दिशेने कूच केली. तिचे एकूण १२४.९ गुण झाले होते. चिनी, कोरिया व स्वित्झर्लंडचे नेमबाज अव्वल तीन स्थानावर होते.

१३व्या शॉट्समध्ये रमितानेन १०.२ गुणांचा वेध घेत पाचव्या क्रमांकावर पकड घेतली. तिने अमेरिकेच्या सॅगेन मॅडालेनासह १३५.१ गुणांसह बरोबरी केली. तिने सलग १०.२ गुण घेतले आणि फ्रान्सच्या ओशियाने मुलरसह सहाव्या क्रमांकावर बरोबरीवर आली. शूटआऊटमध्ये फ्रान्सच्या मुलरने १०.८ गुणांसह बाजी मारली आणि रमिताला ( १०.५) १४५.३ गुणांसह सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुलर १४५.३ गुणांसह पदकाच्या शर्यतीत कायम राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.