India at Paris olympics 2024 Live : महाराष्ट्राच्या कोचसह Ramita Jindal ने पाहिलेलं स्वप्न अधुरे राहिले, पण भारताच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी

Paris Olympic 2024 Live India - २० वर्षीय रमिता जिंदाल हिला १० मीटर एअर रायफल फायनलमध्ये पदकापासून वंचित रहावे लागले, परंतु तिने ज्या प्रकारे खेळ केला, ते पाहून भविष्यात ती नक्की ऑलिम्पिक पदक जिंकेल अशी आशा निर्माण झाली आहे.
Ramita Jindal Suma shirur
Ramita Jindal Suma shirursakal
Updated on

India at Paris olympics 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत २० वर्षीय रमिता जिंदाल ( Ramita Jindal) हिला पदकापासून वंचित रहावे लागले. महाराष्ट्राच्या सुमा शिरूर ( Suma Shirur) यांच्या मार्गदर्शनाखाली रमिताने फायनल गाठली होती. २० वर्षांनंतर १० मीटर एअर रायफल फायनलमध्ये शिरूर यांच्यानंतर प्रवेश करणारी रमिता ही दुसरी भारतीय महिला नेमबाज ठरली. शिरूर यांनाही २००४च्या ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली होती आणि आज रमिताच्या वाट्यालाही तेच आले. 10m Air Rifle Women's Final स्पर्धेत रमिताला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी तिच्या कामगिरीने भविष्याचा आशेचा किरण दाखवला आहे.

रमिताने ( Ramita Jindal ) महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता ( 10m Air Rifle Women's Final Results) फेरीत पाचवे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण, फायनलमध्ये शूट ऑफमध्ये तिला ०.३ गुणांने पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. ती १४५.३ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिली. या गटात दक्षिण कोरियाच्या हायोजिन बॅन ( २५१.८), चीनची युटींग हुआंग ( २५१.८) यांच्यात सुवर्णपदकासाठी टाय झाली होती आणि शूट ऑफमध्ये बॅनने १०.४ गुणांसह बाजी मारली. स्वीत्झर्लंडच्या ऑड्री गोग्नीअॅट २३०.३ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

Ramita Jindal Suma shirur
India at Paris olympics 2024 Live : Ramita Jindal ०.३ गुणांनी पदकाच्या शर्यतीतून झाली बाद; शूट ऑफमध्ये हरली

कोण आहे रमिता जिंदाल? ( Who is Ramita Jindal?)

रमिता जिंदाल ही हरयाणातील लाडवा शहरातील आहेत. येथील स्थानिक नेमबाजी अकादमीतून तिच्याप्रवासाला सुरुवात झाला. रमिताने नेमबाजीच्या अवघ्या १५ दिवसांच्या सरावानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन शुटिंग चॅम्पियनशिपमधून पदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यानंतर तिने २०२१ च्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटात कांस्यपदक जिंकले.

२०२३ मध्ये झालेल्या बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक विजेत्या मेहुली घोषचा पराभव करून रमिता जिंदाल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. रमिता तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूर (अथेन्स २००४) नंतर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रायफल नेमबाज आहे.

Ramita Jindal Suma shirur
India at Paris olympics 2024 Live Update - Manu Bhaker ला पंतप्रधान मोदींचा फोन! कौतुक केलं अन् मग विचारलं...

रमिताने २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत रौप्य पदक आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. २०२४ मध्ये भारतीय ऑलिम्पिक निवड चाचणीमध्ये तिने ६३६.४ गुण मिळवले, जे जागतिक विक्रमापेक्षा ०.१ ने जास्त होते.

तिची कोच सुमा शिरूर या २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर फायनलमध्ये ४९७.२ गुणांसह आठव्या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न रमिता पूर्ण करेल असा विश्वास यावेळी होता, परंतु थोडक्यात तिला अपयश आले. पण, २०२८ मध्ये ही उणीव ती भरून काढेल असा विश्वास शिरूर यांना नक्की असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.