Olympic 2024: सुरु होतोय ऑलिम्पिकचा थरार! कुठे आणि केव्हा पाहाणार सामने? घ्या जाणून

Paris Olympic Live Streaming: ऑलिम्पिकमधील खेळ कुठे आणि कधी पाहाता येणार आहेत, याबद्दल संपूर्ण तपशील जाणून घ्या.
Paris Olympics
Paris OlympicsSakal
Updated on

Paris Olympics 2024 Live Streaming and Broadcast in India: ऑलिम्पिकला खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखलं जातं. २०२१ मध्ये झालेल्या टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीही केली होती. आता सर्वांना वेध लागलेत ते पॅरिस ऑलिम्पिकचे.

ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा पॅरिसमध्ये रंगणार आहे. पॅरिस आणि जवळपासच्या ठिकाणी असलेल्या विविध ठिकाणी क्रीडा प्रकारांनुसार स्पर्धांची ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत.

या स्पर्धेत भारताचेही १०० हून अधिक खेळाडू सामील होणार आहेत. यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे.

Paris Olympics
Paris Olympic: अवघ्या 14 वर्षांच्या धिनीधीचा मोठा पराक्रम! पॅरिस ऑलिम्पिकचं मिळवलंय तिकीट

ऑलिम्पिकची तारीख आणि वेळ काय?

पॅरिस ऑलिम्पिकला २६ जुलैपासून सुरू होत आहे. या दिवशी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीकाठी शहरात होणार आहे.

२६ जुलैला उद्घाटन सोहळा झाल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा शेवट होईल. दरम्यान, उद्घाटन सोहळा जरी २६ जुलैला होणार असला, तरी क्वालिफायरच्या स्पर्धा २४ जुलैलाच सुरू होणार आहेत. भारतीयची मोहिम २५ जुलै रोजी सुरू होईल. यादिवशी तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल.

त्यामुळे भारतीय खेळाडू २५ जुलैपासून ते जवळपास १० ऑगस्टपर्यंत खेळताना दिसणार आहेत. वेळेबद्दल सांगायचे झाले, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारण दुपारी १२ वाजल्यानंतर स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

Paris Olympics
Paris Olympic 2024 : क्रिकेटनंतर ऑलिंपिक, भारतीयांचे पर्यटन कायम; पॅरिसला जाण्यासाठी गर्दी वाढली, आरक्षणात ३० टक्के वाढ

कुठे पाहाणार सामने?

ऑलिम्पिकमधील खेळांचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण भारतात स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या चॅनेलवर होणार आहेत. तसेच जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईटवरही हे खेळ पाहाता येतील. याशिवाय भारतात इंग्लिग, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.

कुठे होणार सामने?

जल क्रीडा प्रकारांसाठी ऍक्वेटिक सेंटर, मार्सिले मरिना, पॉन्ट अलेक्झांड्रे तिसरा, टीहूपोओ, ताहिती अशा ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत.

याशिवाय बर्सी अरेना, बोर्डो स्टेडियम, चॅम्प डी मार्स अरेना, शातो द व्हर्साय, शातारो शूटींग सेंटर, आयफेल टॉवर स्टेडियम, एलानकोर्ट हिल, जेफ्रॉय-ग्विचार्ड स्टेडियम, ग्रँड पापायस, हॉटेल द विल, इन्वॅलिगदे, ला ब्युजॉयर स्टेडियम, कॉन्कॉर्ड, ल बॉर्ग स्पोर्ट क्लाइंबिंग, गोल्फ नॅशनल, लायन स्टेडियम, मार्सेल स्टेडियम, नाईस स्टेडियम, नॉर्थ पॅरिस एरेना,पार्क दे प्रिन्स, पिअर मौरॉय स्टेडियम, पोर्टे डी ला चॅपेल अरेना, स्टेड रोलँड-गॅरोस, सेंट-क्वेंटिन-एन-यवेलीन्स बीएमएक्स स्टेडियम, सेंट-क्वेंटिन-एन-यवेलीन्स वेलोड्रोम, साऊथ पॅरिस अरेना, स्टेड डी फ्रान्स, ट्रोकाडेरो आणि यवेस-डु-मनोइर स्टेडियम या ठिकानांवरही विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.